मराठी

बोरगाव धर्माळे येथे शिवसेना प्रहारची युती नाही

उपसरपंच जोगेंद्र मोहोड यांची स्पष्टोक्ती

नांदगांव पेठ/प्रतिनिधी दि १४ – बोरगाव धर्माळे येथे सरपंच उपसरपंच निवडणुकीत प्रहारने शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिला नसून शिवसेनेचे आशिष धर्माळे यांनी वृत्तपत्रांमधून प्रहरच्या पाठिंब्याचा उल्लेख करत बातम्या प्रकाशित केल्या. विजय धर्माळे यांच्या गटाने सहकार्य केल्याने जोगेंद्र मोहोड उपसरपंच पदी विराजमान झाले असून ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्याने आशिष धर्माळे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप जोगेंद्र मोहोड यांनी केला आहे.
     ग्रामपंचायत निवडणुकीत आशिष धर्माळे गटाचे तीन,जोगेंद्र मोहोड यांच्या गटाचे तीन आणि विजय धर्माळे गटाचे तीन असे असे नऊ सदस्य निवडून आले विजय धर्माळे गटाने जोगेंद्र मोहोड यांच्या गटाला बिनशर्त पाठिंबा देत त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली.मात्र सरपंच पदाचा उमेदवार अनुसूचित जमाती महिला असल्याने आणि सदर उमेदवार आशिष धर्माळे गटाकडे असल्याने त्यांना संविधानानुसार सरपंचपद बहाल करण्यात आले मात्र आशिष धर्माळे यांनी शिवसेना व प्रहार यांची युती दाखवत ग्रामपंचायतवर भगवा फडकल्याचा केलेला दावा चुकीचा आणि खोटारडा असल्याचा आरोप जोगेंद्र मोहोड यांनी केला आहे.
      विजय धर्माळे गटाच्या चेतन वानखडे, जयश्री मरोडकर, तसेच सुवर्णा मोहोड, रंजना मोहोड, या निर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांनी मला सहकार्य केले.त्यामुळे वृत्तपत्रांमधून प्रकाशित केलेल्या बातम्या या हेतुपुरस्सर आणि स्वतःचा पराभव लपविण्यासाठी करीत असल्याचा आरोप नवनियुक्त उपसरपंच जोगेंद्र मोहोड यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button