मराठी

अयोध्येत महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम व स्मारक व्हावे

गुरुदेव महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समिती पदाधिकारी यांचे निवेदन

अमरावती/दि. १९ – रामायण ग्रंथाची निर्मिती करून संपूर्ण विश्वातील पिढ्यानुपिढ्यांपर्यंत प्रभू श्रीरामचंद्र यांची महती पोहोचविणा-या  रामायण रचियता आद्यकवी  महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम व पवित्र स्मारकाची अयोध्येत निर्मिती करावी यासाठी भारताचे कार्यतत्पर प्रधानमंत्री नरेंदजी मोदी यांना मागणी केली होती.सोबतच  श्री. राम मंदिर ट्रस्ट चे प्रमुख अध्यक्ष नृत्यगोपालदास महंत यांनी या कार्याला स्विकृती देण्यासाठीही विनंती करावी अशी मागणी गुरुदेव महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समितीच्या पदाधिका-यांनी प्रधानमंत्री निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचे निवेदन भक्त बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना गुरुदेव महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समितीचे सहआयोजक महादेव कोळी समाज संघटनेचे नेते उमेश महादेवराव ढोणे यांचे नेतृत्वाखाली एकनाथ वावरे, प्रकाश दंदे, संतोष कोलटेके, श्रीमती मीरा कोलटेके, गोपालराव ढोणे ,शरदराव खेडकर,श्रीकृष्णा इंगळे, कैलास खोब्रखेडे, उमेश दंदे, गजानन  वानखडे आदींनी हे निवेदन  नुकतेच दिले.
अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निर्माण होत असताना रामायणाचे रचियता महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम व स्मारकाची उभारणी झाल्यास अयोध्येत येणा-या भाविकांना व नव्या पिढीला ते प्रेरणादायी ठरेल, असे समितीने  निवेदनात म्हटले आहे.
 महर्षी वाल्मिकी यांनी दिव्य ज्ञानाद्वारे प्रभू श्रीरामचंद्र  जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकी रामायण लिहीले. वाल्मिकी रामायणातून श्रीरामांचा इतिहास जगासमोर मांडला. वाल्मिकी यांनी लिहीलेला एक एक शब्द तंतोतंत खरा ठरला आहे. महर्षी वाल्मिकी यांची ओळख तसेच त्यांचा देदिप्यमान इतिहास जगासमोर येणे गरजेचे असून अयोध्या येथे  प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या परिसरातच महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम स्थापन करण्याची मागणी  गुरुदेव प्रेमींनी भक्तांनी  प्रधानमंत्री यांच्याकडे केली होती.
        महर्षी वाल्मिकी यांनी प्रभू श्रीरामांचा इतिहास जगासमोर आणला. त्यांच्या किर्तीला साजेसा उत्कृष्ट असा आश्रम अयोध्येत निर्माण होणे गरजेचे आहे. या माध्यमातून गुरु-शिष्य परंपरा, इतिहास जगासमोर येण्यास मदत होईल. श्रीरामांसोबतच महर्षी वाल्मिकींचा इतिहास जुळलेला आहे. त्यांचे कार्य नवीन पिढीला
प्रेरणादायक ठरावा यासाठी केंद्र सरकारने याबाबत विचार करणे गरजेचे आहे. अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भव्य मंदिराच्या परिसरातच महर्षी वाल्मिकी गुरुदेवांचा आश्रमही निर्माण झाला पाहिजे असे आशयाचे निवेदन दिले असता जिल्हाधिकारी यांनी प्रधानमंत्री कार्यालयात शिफारस पत्र पाठवले आहे.समितीचे सहआयोजक व कोळी समाज संघटनेचे नेते उमेश ढोणे यांनी सांगितले.

महर्षी वाल्मिकी यांचे जीवनकार्य जगासमोर यावे- उमेश ढोणे

अयोध्येत वाल्मिकी आश्रमाची स्थापना करण्यासाठी प्रधानमंत्री तसेच अयोध्या श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिरांचे प्रमुख अध्यक्ष  महंत नृत्य गोपालदास यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. ज्याद्वारे देशातील सर्व समाज बांधवांना जोडल्या जाईल देशात एकतेचा संदेश या शुभ कार्यातून साधला जाईल, आमच्या आध्यात्मिक कार्याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन शिफारस पत्र पि. एम .ओ. ऑफिस ला  पाठवले आहे.असेही श्री. उमेश ढोणे यांनी सांगितले

Related Articles

Back to top button