मराठी

लॉकडाऊनपुर्वी गोरगरिब व्यावसायिकांचा विचार करा

लॉकडाऊनचा पुनर्विचार करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

वरुड दी २४ – शहरात लॉकडाऊन (जनता क फ्र्यु) सुरु करण्यापुर्वी गोर-गरिब व्यावसायिकांचा विचार करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे की, लॉकडाऊनमुळे या आधीच गोर-गरिब व्यवसायिकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन गोरगरिब व्यावसायिकांचा चहा कॅन्टीन, फळ विक्रेते, पान टपरी इत्यादी छोटे व्यावसायिक यांचा ६ महिन्यापासुन त्यांचा व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांच्या परिवाराचे खुप हाल झालेत. आता कसे बसे १५ दिवसापासुन त्यांनी त्याच्या छोट्या दुकानदा:या हात उसने पैसे आणुन व्यवसायाकरिता मटेरियल, वस्तु खरेदी केल्या. आता दुष्काळात तेरावा महिना नगरपालिकेने जनता कफ्र्युची मागणी काही नामवंत संघटनेच्या आधीच मालदार आहे. त्यांचे या लॉकडाऊनमुळे काहीच बिघडत नाही पण लहान व्यावसायिक नक्कीच आत्महत्या करणार.
या वरुड शहरातील व्यावसायिक यांनी जे जनता कफ्र्युची मागणी केली ती लहान व्यावसायिकांना विचारात घेवुन करायला पाहिजे होती, अशी मागणी लहान व्यावसायिक यांच्या तर्फे तीव्र रोष आणि मागणी होत आहे. शहरात या व्यावसायिकांनी जर दुकाने सुरु करण्यापुर्वी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन केले असते तर शहरात कोरोना सारखा महामारीच्या प्रार्दुभावाला नक्कीच आळा बसला असता. तरी लॉकडाऊन सुरु करण्यापुर्वी गोरगरिब व्यावसायिकांचा विचार करण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी लॉकडाऊनला न जुमानता गोरगरिबांच्या हक्कीसाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव सुशील बेले, प्रसिद्धीप्रमुख अमर हरले, प्रविण कोहळे, महेंद्र निस्वादे, राकेश गाढे, चंदन शिहाले, अॅड.प्रदीप दुपारे, अशोक गडलिंग, अरविंद गाडगे आदींनी दिला आहे.

Related Articles

Back to top button