घरगुती गॅसच्या किंमतीत तिसर्यांदा वाढ
मुंबई/दि.२५ – तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या सिलिंडर्सच्या किंमती या महिन्यात तिसर्यांदा वाढवल्या आहेत. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलोगॅस सिलिंडरची किंमत 769 रुपयांवरून 794 रुपयांवर गेली आहे. विना अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत आज 25 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारीत तिसर्यांदा सिलिंडर महाग झाला.
सरकारनेचार फेब्रुवारीला घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर, 15 फेब्रुवारीला एकाच सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आणि आता ही तिसरी वेळ आहे. याचा अर्थ 25 दिवसांत घरगुती गॅसच्या किंमतीत शंभर रुपयांनी वाढ झाली. एक डिसेंबरपासून सिलिंडर दोनशेरुपयांनी महाग झाला. 1 जानेवारीला पुन्हा 50 रुपयांची वाढ करण्यात आली, त्यानंतर 644 रुपयेअसलेलेसिलिंडर 694 रुपयेकरण्यात आले. चार फेब्रुवारीला वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 644 रुपयांवरून 719 रुपयांवर गेली आहे. 15 फेब्रुवारीला ही किंमत 719 रुपयांवरून 769 रुपयांवर गेली आणि 25 फेब्रुवारीला किंमत 769 रुपयांवरून 794 रुपयांवर गेली.
डिसेंबरमध्येही दोनदा किंमती वाढविण्यात आल्या. जानेवारीत तेल विपणन कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. तथापि, डिसेंबरमध्येदोनदा 50-50 रुपयांची वाढ झाली. अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजेच एक फेब्रुवारीला अनुदान विना 14.2 किलोगॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही; परंतु19 किलोवाणिज्यिक सिलिंडरच्या किंमतीत 191 रुपयांची वाढ झाली आहे. सरकार 12 सिलिंडरवर अनुदान देते. ग्राहकाला प्रत्येक सिलिंडरवरील अनुदानासह किंमत मोजावी लागते. नंतर अनुदानाची रक्कम खात्यावर परत केली जाते. ग्राहकांना यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील, तर त्यांना बाजारभावाने खरेदी करावे लागते. तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि अमेरिकी डॉलरच्या विनिमय दरावर अवलंबून असणारी वाढ किंवा घट अवलंबून आहे. या वर्षात पेट्रोल 7.12 रुपयांनी तर डिझेल 7.45 रुपयांनी महाग झाले आहे.