मराठी

आयकर खात्याच्या छाप्यांमध्ये हजार कोटींची रोकड जप्त

चेन्नई/८ नोव्हेंबर – आयकर खात्याच्या पथकांनी चेन्नई येथील एका आयटी इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाशी संबंधित कंपनीवर छापेमारी करून एक हजार कोटी रुपयांची रोकड जप्त केली. इतकी मोठी रक्कम पाहून आयकर अधिकारीही आश्चर्यचकीत झाले आहेत.
मदुराई आणि चेन्नईसह पाच ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. इतकी मोठी रक्कम कुणीही कार्यालय किंवा घरात ठेवत नाही. त्यामुळे मोठ्या घोटाळ्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आयकर सूत्रांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेल्या या रकमेचा कोणताही हिशेब किंवा नोंद कंपनीकडे आढळून आली नाही. दरम्यान, या कंपनीने सिंगापूरमधील एका कंपनीत गुंतवणूक केल्याचा संशय आयकर विभागाला असून, तसे पुरावेही हाती लागले आहेत. छापा मारण्यात आलेल्या कंपनीशिवाय अन्य बड्या कंपन्यांनीही सिंगापूर कंपनीतील शेअर विकत घेऊन गुंतवणूक केली असल्याचे यात दिसून आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयकर विभागाने ज्या कंपनीवर छपा मारला, त्या कंपनीकडे सिंगापूर येथील कंपनीचे 72 टक्के समभाग आहेत, पण प्रत्यक्षात खूप कमी गुंतवणूक दाखवली आहे. शिवाय इतर कंपन्यांचे शेअर कमी असले तरी गुंतवणूक जास्त आहे. सूत्रांच्या मते, सिंगापूरमध्ये असलेल्या कंपनीला चेन्नईतील या कंपन्यांनी सुमारे 7 कोटी सिंगापूर डॉलर्सचा फायदा करून दिला आहे, पण कंपनीने याबाबतची माहिती लपवली आहे.

Related Articles

Back to top button