मराठी

‘गूगल‘च्या सर्विसेस डाऊन हजारो यूझर्सच्या तक्रारी

सेवा पूर्ववत करण्यावर भर

मुंबई/दि.२० – जगातील सर्वांत मोठ्या टेक कंपन्यांमध्ये सामील असलेल्या ‘गूगल‘ (Google) च्या अनेक सर्विस डाऊन झाल्या आहेत. सर्वांत जास्त समस्या जीमेल, गूगल ड्राइव्ह आणि यूट्यूबवर येत आहेत. त्यामुळे यूजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीमेल आणि गूगल ड्राइव्हवर फाइल अ‍ॅटच होण्यास अडचणी येत आहेत. यूट्यूबवरही व्हिडिओ अपलोड करण्यास अडचणी येत आहेत. ‘गूगल‘च्या एकूण सहा सव्र्हिसेसबाबत तक्रारी आल्या आहेत. जीमेल, ड्राइव्ह आणि यूट्यूबसह गूगल मीट, गूगल व्हॉइस आणि गूगल डॉक्सवरही काही तांत्रिक अडचणी येत आहेत. डेस्कटॉपसह अ‍ॅप्सवरही समस्या येत आहेत. तक्रारी मिळाल्यानंतर ‘गूगल‘ने या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

यासंबंधी ट्विटरवर गेल्या काही तासामध्ये हजारो यूजर्सने तक्रारी केल्या आहेत. इंटरनेटवर नजर ठेवणाèया डाउनडिटेक्टर वेबसाइटनुसार २० ऑगस्टला सकाळी नऊ वाजता ही समस्या आली. सर्वांत जास्त ६२ टक्के समस्या फाइल अ‍ॅटेचमेंटच्या, २७ टक्के लॉगइनच्या आणि दहा टक्के समस्या मेसेज रिसिव्ह करण्यात येत होत्या. जीमेल qकवा ड्राइव्हवर कोणतीही फाइल अ‍ॅटच केल्यावर वारंवार फाइल जंप होत होत्या. पुन्हा अ‍ॅटच व्हायला सुरुवात करावी लागत होती. गेल्या महिन्यातही जीमेलमध्ये समस्या आली होती. अनेक यूजर्सला लॉगिन करण्यास समस्या येत असल्याच्या तक्रारी होत्या.

Related Articles

Back to top button