मराठी
सौभाग्य योजनेचे यवतमाळात तीन-तेरा
अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षाला पाहून घेण्याची धमकी
यवतमाल/दि.१ – टाळेबंदी काळात यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना वीज वितरणाने अव्वाच्यासव्वा पट वीज बिल दिले, सौभाग्य योजना फक्त यवतमाळ वीज वितरणाने कागदावरच दाखवली, दारव्हा तालुक्यातील आमशेत येथे विजेच्या तारेचा स्पर्श झाडाला असल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, मृतक शेतकऱ्याची पत्नी व चार मुलीसह गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी विविध मागण्यांचे निवेदन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांना दिले
कोरोना विषाणूचा वाढतात संसर्ग पाहता. महाराष्ट्रात तीन महिने टाळेबंदी करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र घरी बसून शासन व प्रशासनाला सहकार्य केले, त्यातच वीज वितरण यवतमाळ कार्यालयातील अधिकार्यांनी मनमानी कारभार चालवीत अनेकांना अव्वाच्यासव्वा पट विज बिल दिले, गोर गरीब नागरिक कुठून पैसे आणून विज बिल भरणार यवतमाळ जिल्ह्यातील समस्त नागरिकांचे टाळेबंदी काळातील तीन महिन्याचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन गुरुदेव युवा संघाच्या वतीने ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना देण्यात आले, दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेसाठी एका रुपयात सौभाग्य योजना आणली, गोरगरीब नागरिकांनी वीज वितरण यवतमाळ कार्यालयात रीतसर अर्ज केले
मात्र अनेक चुका काढून अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दोन वर्षापासून गरिबांना विद्युत जोडणी पासून वंचित ठेवले, सौभाग्य योजनेत अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना मलाई मिळत नसल्याने त्यांनी सौभाग्य योजनेअंतर्गत गरिबांना वीज मीटर दिले नसल्याचा आरोप गुरुदेवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, सौभाग्य योजनेविषयी अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना मनोज गेडाम यांनी विचारणा केली असता सौभाग्य योजना सोडून बोला,आम्ही आमचं बघू,जास्त बोलाल तर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज यांना दिली असल्याचा आरोप मनोज गेडाम यांनी यावेळी केला आहे,
अधीक्षक अभियंता यांची अरेरावी थांबवा,अशा मागणीचे निवेदन गुरुदेव संघाच्यावतीने ऊर्जामंत्री यांना देण्यात आले,नुकतेच आमशेत येथे विजेच्या तारेचा स्पर्श झाडाला असल्याने एका शेतकऱ्याचा झाडाला हात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे मृतक शेतकऱ्याच्या पत्नीसह चार मुली उघड्यावर आले आहे, शेतकऱ्यांचा मृत्यू हा केवळ वीज वितरण कार्यालयातील अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप गुरुदेव सेवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे,
मृतक शेतकर्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व पत्नीला वीज वितरणाने शासकीय सेवेत घ्यावे अशा मागणीचे निवेदन गुरुदेव संघाच्या वतीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना देण्यात आले,निवेदनाची दखल येत्या दहा दिवसात ऊर्जामंत्री यांनी घेतली नाही तर आमसेत येथील महिलांना समवेत गुरुदेव युवा संघाच्या वतीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निवासस्थानी मागणी पूर्ण होत पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सांगितले आहे,