मराठी

‘चिखलदरा पर्यटन’ चे उद्या प्रकाशन

अमरावती प्रतिनिधी/ १४ ऑक्टोबर : चिखलदरा येथील ज्येष्ठ पत्रकार व पर्यटन मित्र मोहम्मद अश्रफ यांच्या ‘चिखलदरा पर्यटन’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे. यावेळी निसर्गप्रेमी, तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, पत्रकार अनिल कडू, अनिल गडेकर, हर्षवर्धन पवार आदींनी केले आहे.

Back to top button