मराठी

राजुरा बाजारच्या वैद्यकीय अधिका:यांची बदली करा

ग्रामवासियांची जि.प.मुख्य कार्यकारी अधिका:यांकडेे मागणी

वरुड प्रतिनिधी। २१ – येथुन जवळच असलेल्या राजुरा बाजार येथील प्राथमिक स्वास्थ केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राजुरा बाजार ग्रामवासियांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर केले आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, राजुरा बाजार येथे एक कोविड-१९ रुग्ण व ३ प्रलंबित रुग्ण एकाच कुटुंबात आढळले व त्याच कुटुंबातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्या रुग्णांवरील प्रथम उपचार आवश्यक असताना येथील आरोग्य केंद्र वा:यावर असून रुग्णांना अजून पर्यंत उपचार मिळाले नाही. १८ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ८.३० वाजता तापाने फणफणलेला रुग्ण आरोग्य केंद्रात आला असता व कोविड-१९ असलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील नातेवाईक आरोग्य केंद्रात आले असता तेथे एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. राजुरा बाजार येथील आरोग्य केंद्र हे बेवारस आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.भुतडा रुग्णांशी अरेरावीची भाषा करीत असून रुग्णांना तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, असे बोलतात तसेच त्यांना वरुड येथे जाण्यास सांगतात. बाह्य रुग्ण विभाग नियमित होत नाही. दुपारी होणारी ओपीडी बंद असते व निवासी वैद्यकिय सेवा असतांना एकही डॉक्टर हजर राहत नाही. त्यामुळे रुग्णांना आकस्मिक करून सेवा मिळत नाही व रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागते तसेच येथील वैद्यकीय अधिका:यांच्या नियुक्ती झाल्यापासून येथे वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णाला प्रसुतीकरिता तालुक्याला जावे लागत असल्यामुळे येथील प्रसुती संख्या घटलेली आहे, त्यामुळे वरील सर्व बाबींची चौकशी करून वैद्यकीय अधिकारी डॉ.भुतडा यांची तत्काळ बदली करून येथे नवीन वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा राजुरा बाजार येथील सर्व ग्रामवासी जनतेकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच किशोर गोमकाळे, नितीन बहुरुपी, सतिश बहुरुपी, राहूल श्रीराव, सचिन आंडे, अजय शेटे, प्रशांत बहुरुपी, देविदास भोंडे, योगेश भोंडे, प्रफुल्ल निमजे, प्रविण बहुरुपी, दर्शन जाणे, निखिल भोंडे, गिरीश वरुडकर, गजानन निकम, बाबाराव मांगुळकर, शरद काकडे, वैभव पाटील, सचिन पाटील, शिवहरी गोमकाळे, प्रफुल मांगुळकर, पुंजाराम इंगळे यांचेसह शेकडो गावक:यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button