लेखा व कोषागारे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांची औरंगाबाद येथे बदली
लेखा व कोषागारे अमरावती विभागीय कार्यालयाकडून भावपूर्ण निरोप
अमरावती, दि. 20 : अमरावती विभागाचे लेखा व कोषागारे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांची बदली सहसंचालक म्हणून औरंगाबाद विभागात झाली. त्यानिमित्त दि. 19 ऑगस्ट रोजी लेखा व कोषागारे अमरावती विभागीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना अगदी साध्या कार्यक्रमात भावपूर्ण निरोप दिला. कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग आदी दक्षता पाळून निरोप समारंभ पार पडला.
श्री. सोनकांबळे यांना औरंगाबाद येथे रुजू होण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी मध्यान्हनंतर कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दिपक केदार यांची पदस्थापना झाली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. श्री सोनकांबळे हे अमरावती विभागीय कार्यालयात सहसंचालक या पदावर जून 2017 पासून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात लेखा व कोषागारे विभागाचे काम गतीशिल व पारदर्शक होण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. विशेषत: लेखा कोष भवन इमारतीमध्ये रेनवॉटन हारवेस्टींग प्रणाली लावून वाया जाणारे लाखो लिटर पाणी संचयन करुन पाण्याचा उपयोग झाला आहे. श्री. सोनकांबळे यांच्या पुढाकाराने सदर इमारतीमध्ये विजेची बचत व्हावी म्हणून 40 कीलोवॅटचे सोलर एनर्जी सिस्टीम बसविण्यात आली असून यामुळे हजारो रुपयांची विजेची बचत झाली आहे.
अशा या गुणवंत व प्रामाणिक अधिकाऱ्याला संपूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. निरोप समारंभाला वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यासह इतर अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.