मराठी
आदिवासी बांधवांची वाघबारस चा कार्यक्रम सोशियल डिस्टन ठेऊन साजरा
अमरावती, 23-नोव्हें : आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.आदिवासी बांधवांच्या परंपरेनुसार दिवाळीतील वाघबारस वर्षभरात
केलेले नवस फेडण्याचा हा मोठा आदिवासी उत्सव,सण असल्याचे मानले जाते, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामूहिकरित्या वाघबारस न करता आदिवासीबांधवांनी घरगुती पदधतीने साजरी केली.
आदिवासींच्या जीवनात बाघबारसचे मोठे महत्व आहे. दिवाळीत वसुबारस साजरी केली जाते, त्याच धर्तीवर दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात वाघबारस साजरी करण्याची परंपरा
शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. अमरावती जिल्ह्यातील उमेश महादेवराव ढोणे या आदिवासी पदाधिकारी ,बांधवांनी ती जपली आहे. आदिवासी परंपरे नुसार
वाघाला देव मानले जाते. गावाच्या वेशीवरील मंदिरात जावून तेथे वाघाचे पूजन केले जाते. अनेक भागात मांसाहाराचा तर काही भागात तांदळाच्या खिरेचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
यंदा मात्र या उत्सवावर कोरोनामुळे विरजन पडले तरी आदिवासी बांधवांनी घरगुती पूजनान ही परंपरा जोपासल्याचे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उमेश ढोणे यांनी वागदेवता चे आदिवासी प्रथेप्रमाणे पूजन करून वाघबारस चा कार्यक्रम केला असे त्यांनीसांगितले.