मराठी

स्वस्त धान्य वितरण करतेवेळी अंगठा पध्दत बंद करा

वरुड/दि.२५ – स्वस्त धान्य वितरण करतेवेळी अंगठा पध्दत बंद करावी, कोरोना महामारीत सुद्धा स्वस्त धान्य दुकानांच्या आंगठा घेण्याच्या पध्दतीमुळे कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शासनाने तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी वरुड तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, कोरोनाचे भयंकर संकट शेंदुरजनाघाट व मलकापूर शहरात पसरले असुन नागरिक मात्र जनता कफ्र्यु व सोशियल डिस्टन्सिचे पालन करीत आहे परंतु अशा घातक परिस्थितीत सुद्धा स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांच्या अंगठ्याचे मशिनवर ठसे घेवुनच धान्य वितरण करीत आहे. दिवसभरात शेकडो ग्राहक त्या मशिनवर आपला आंगठा ठेवतात, त्यामुळे संसर्ग होण्याची हमखास शक्यता आहे. काही दिवसांआधी शासनाने सुद्धा सांगितले की धान्य वाटप करताना संपर्क येणार नाही अशी व्यवस्था करा किंवा विना आंगठा घेता धान्य वितरण करावे परंतु शेंदुरजनाघाटमध्ये स:र्हासपणे अंगठ्याचा ठसा मशिन वर घेवून वितरण सुरु आहे आणि सोशियल डिस्टन्सिंचा फज्जा उडत आहे त्यामुळे स्वस्त धान्य वितरण करतेवेळी अंगठा पध्दत बंद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
सदर निवेदन देते वेळी वरुड तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नेपाल पाटील, काँग्रेसचे नगरसेवक धंनजय बोकडे अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष शेख नासीर (बबलुभाई), वरुड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी रडके, विजय चौधरी, गोपाल माळोदे, संदीप दामेधर आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button