मराठी

एका हंगेरियन महिलेकडे वीस हजार टेडी बेअर

बुडापेस्ट/दि.१९ – टाळेबंदीच्या काळात एक महिला मुलांना टेडी बेअर विनामूल्य देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे तिच्या घरात सुमारे वीस हजार टेडी वेअर साठले आहेत. त्यांच्या संग्रहाची गिनीज बुकात नोंद घेतली गेली आहे. गेल्या 40 वर्षांपासून व्हॅलेरिया नामक महिला टेडी बेअर गोळा करीत आहे. 13 हजार टेडी गोळा झाले तेव्हा तिला वाटले कीआपल्याकडे खूप मोठा संग्रह झाला आहे. तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा विचार केला. तिच्या व्हिडिओची दखल घेतली गेली. 2019 मध्ये व्हॅलेरियाचे नाव टेडी बेअरच्या सर्वात मोठ्या कलेक्शनसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आले. काही वर्षांत व्हॅलेरियाचा संग्रह आणखी वाढला. कधीकधी काही लोक त्यांना टेडी बेअर भेट देतात. कधीकधी ती स्वतः विकत घेते. त्यांनी आपल्याकडील टेडी बेअर नर्सरी, प्री-स्कूल आणि गरीब मुलांमध्ये वाटण्यास सुरुवात केली. त्यांनी बर्‍याच ठिकाणी गरजू मुलांना टेडी बेअर देण्यासाठी प्रदर्शनदेखील लावले. येथे मुलांना या खेळण्यांशी खेळायला आनंद झाला; परंतु कोरोना साथीच्या आजारात त्या मुलांना ते टेडी बेअर वाटू शकल्या नाहीत.
व्हॅलेरियाचे बालपण गरिबीत गेले होते. लहानपणी त्यांच्याकडे खेळणी नव्हती. खेळणी नाहीत, चांगले कपडे नाहीत अशी स्थिती होती. आपल्यावर जी वेळ आली तशी इतरांवर येऊ नये म्हणून त्यांनी टेडी बेअर इतर मुलांना खेळण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या वयातदेखील त्यांना टेडी बेअर घ्यायला आवडते. मुले त्यांचे प्रदर्शन बघायला येतात तेव्हा ती आनंदी असतात आणि टेडी बेअरसह खेळण्यात आनंदी होतात हे पाहून समाधान वाटत असल्याचे त्या सांगतात.

Back to top button