मराठी

एअर इंडियाच्या खरेदीसाठी दोन कंपन्या उत्सुक

नवी दिल्ली/दि.८ – एअर इंडियावर 38 हजार 366 कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर एअर इंडियाचे सरकारी खात्यांकडून पाचशे कोटी रुपयांचे येणे आहे. एअर इंडियाची विक्री करण्यासाठी 20 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. आता एअर इंडिया ही सरकारी कंपनी विकत घेण्यासाठी फक्त टाटा समूह आणि खासगी विमान कंपनी स्पाइसजेट रांगेत राहिली आहे. इतर कंपन्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत. या प्रकरणाशी परिचित स्त्रोतांनी ही माहिती दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मूल्यांकन कंपन्या अन्य कंपन्यांचे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) नाकारले गेले आहेत. एअर इंडिया खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी ईओआय दाखल केले होते. इच्छुक खरेदीदारांच्या संपर्कात व्यवहार सल्लागार सूत्रांच्या माहितीनुसार एअर इंडियाचा व्यवहार सल्लागार इच्छुक खरेदीदारांच्या संपर्कात आहे. व्यवहार सल्लागार इच्छुक खरेदीदारांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. सरकारचे समाधान झाल्यावरच पात्र खरेदीदारांना कळविण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. टाटा सन्स आणि स्पाइसजेट व्यतिरिक्त न्यूयॉर्कच्या इंटरप्स इंक यांचे संयुक्त उद्यमही एअर इंडिया ताब्यात घेण्यास उत्सुक आहेत. एअर इंडिया खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी ईओआय सादर केले होते. ही माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (डीआयपीएएम) चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिली.
एअर इंडियाची विक्री प्रक्रिया दोन टप्प्यांत विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात इच्छुक कंपन्यांकडून ईओआयची मागणी केली गेली आहे. गुणवत्तेच्या आधारे यशस्वी ईओआय निवडल्या जातील. दुस-या टप्प्यात यशस्वी खरेदीदारांना विनंती प्रस्ताव (आरएफपी) देण्यात येतील. एअर इंडियाची संपूर्ण विक्री प्रक्रिया पारदर्शक असेल. माजी कर्मचा-यांच्या गटाने एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी खरेदी करण्यासाठी अर्ज केला. याशिवाय एस्सार ग्रुप, पवन रुईयाची कंपनी डनलॉप आणि फाल्कन टायर्स यांनीही ईओआय एअर इंडिया खरेदीची तयारी दाखविली होती. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एअर इंडियाची तूट दहा हजार कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीचे मूल्यांकन कमी होऊ शकते. यामुळे सरकारला एअर इंडियाची विक्री करणे अधिक कठीण होऊ शकते. आतापर्यंत ब-याच कंपन्यांनी यात रस दाखविला आहे; परंतु शासनाच्या अटी आणि मोठ्या कर्जामुळे कोणताही खरेदीदार येत नाही. टाटा समूह अजूनही ते खरेदी करण्यात रस दाखवत आहे. कारण टाटा समूहानेच याची सुरुवात केली. टाटा समूहाची समस्या अशी आहे, की ती एअर एशिया आणि विस्तारामध्ये आधीच भागीदार आहे. एअर इंडियाकडे एकूण 46 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात जमीन, इमारत, अचल आणि इतर मालमत्ता आहेत.

 

Related Articles

Back to top button