मराठी

दोन खतरनाक दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक

बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेचे मेंबर्स

मुंबईदि /७ – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला आज ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल‘ (BKI) या दहशतवादी संघटनेच्या दोन खतरनाक दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठादेखील हस्तगत करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकी दरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, भूपेंदर उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंह अशी त्यांची नावे आहेत.
या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणवर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये सहा पिस्तुले आणि ४० काडतुसांचाही समावेश आहे. हे दोघेही पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी असून, पंजाबमध्ये अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये ते मोस्ट वॉन्टेड देखील आहेत. ‘बीकेआय‘ला बब्बर खाला इंटरनॅशनल असे म्हटले जाते. ही भारतातील एक खलिस्तानी दहशतवादी संघटना आहे.

Related Articles

Back to top button