मराठी

दोन दिवसात दोघांचा मृत्यू ; 21 पोझिटीव्ह

रुग्ण संख्येमध्ये वाढ सुरूच

वरुड/दि. ५ – तालुक्यात कोरोना संक्रमीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांना पुन्हा शहरातील दोघांचा कोरोणा आजाराने मृत्यू झाला तर दोन दिवसात 21 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील  कोरोणा संक्रमित रुग्ण संख्येची पाचव्या शतकाकडे वाटचाल दिसत असुन दरम्यान आजपर्यंत 31 लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसुन दिवसेंदिवस कोरोना  पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसुन येत असतांना सुद्धा या भागातील लोकप्रतिनिधी मात्र कुंभकर्णी झोपेतच असल्याचे चित्र दिसुन येत आहे. तर दुसरीकडे रोजगार नसतांना सर्व सामान्य नागरीकांवर कोरोना आजाराचा आघात होत असुन सुद्धा तालुक्यात अद्यापही कोविड रुग्णालयाची निर्मीती प्रशासनाला करता आली नसल्याने नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केल्याजात आहे. दिवसाआड कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना गेल्या दोन दिवसात पुन्हा वरूड येथील 17, जरुड येथील 1, बेनोडा (शहीद) येथील 1, सावंगा येथील 1 तर मांगरूळी पेठ येथील 1 रुग्णांसह एकुण 21 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील जायंटस् चौक परीसरातील 65 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा नागपुर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला तर त्यांचे कुटुंबातील ईतर 4 सदस्यांचा कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते सुध्दा नागपुर येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे.
तर शहरातील आणखी एका 85 वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याने शहरात आज पुन्हा दोघांचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्याने मृतकांची आजपर्यंत संख्या 31 झाली आहे. आजपर्यंत तालुक्यात एकुण 452 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले त्यातुन 364 उपचार घेउन स्वगृही परतलेले, 57 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे तर 31 लोकांचा कोरोणा आजाराने आजपर्यंत मृत्यु झाला आहे. शहर व ग्रामीण भागातील नागरीक आता स्वत:हाच वेगवेगळ्या शहरात जाउन कोरोणा चाचणी केल्यानंतर प्रशासनाला माहिती सुद्धा देत नसल्याने शहरासह तालुक्यातील कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण व मृतकांची संख्या यापेक्षा सुध्दा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणुन तहसीलदार किशोर गावंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल देशमुख, वरुड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार, वरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील, शेंदुरजनाघाटचे मुख्याधिकारी गजानन भोयर, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, वरुडचे ठाणेदार मगन मेहते, शेंदुरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम, बेनोडा (शहीद) चे ठाणेदार सुनिल पाटील तसेच या अधिकाऱ्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहे.
Back to top button