मराठी

पोलिस अधिका-यासह दोन जवान काश्मीरमध्ये हुतात्मा

सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका तुकडीवर गोळीबार केला

श्रीनगर/दि.१७जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील करिरी भागात दहशतवाद्यांनी सोमवारी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका तुकडीवर गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जण हुतात्मा झाले. केंद्रीय राखीव दलाच्या दोन जवानासह पोलिसांच्या एका विशेष अधिकाèयाला गोळी लागली. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. या भागात नाकेबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. चार दिवसांत सुरक्षादलांवर दहशतवादी हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. १४ ऑगस्ट रोजी नौगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिस हुतात्मा झाले. मागील काही दिवसांपासून पोलिस आणि सैन्य दलावरील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. १२ ऑगस्ट रोजी देखील बारामुल्लाच्या सोपोरमध्ये सुरक्षादलांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये एक जवान जखमी झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलाला निशाणा बनवले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात एक जुलै रोजीदेखील सीआरपीएफच्या दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान हुतात्मा, तर तीन जखमी झाले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक नागरिकाचा मृत्यू झाला. या व्यक्तीसोबत त्यांचा तीन वर्षीय नातू होता. सुरक्षा दलाने त्या मुलाल वाचवले. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर सज्जाद उर्फ हैदर याचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिस व जवानांसाठी हे मोठे यश असल्याचे काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले. आतापर्यंत या चकमकी दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button