मराठी

दोन दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा

लष्कर -ए तैय्यबाचा कमांडर सैफुल्ल चा खात्मा

श्रीनगर/दि.१४ – जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यांतील चाकुरा परिसरात आज जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच या परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीर खोरयांत काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसताच जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये दहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले. दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर -ए तैय्यबाचा कमांडर सैफुल्ला याचादेखील खात्मा करण्यात आला आहे. आज दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पाकिस्तानातील लष्कर – ए – तैय्यबाचा कमांडर सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान हुतात्मा आले. आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवाशी असून त्याची चौकशी सुरू आहे.

Back to top button