मराठी

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक :

१ गंभिर वरुड ते रोशनखेडा मार्गावरील घटना

वरुड ९ – येथून रोशनखेडाकडे दुचाकी जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर दोघे जखमी झाल्याची घटना रात्री ७.३० च्या सुमारास वरुड ते रोशनखेडा दरम्यान घडली. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभिर असून दोघेही मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
प्राप्त माहीतीनुसार, वरुड येथून मद्य प्राशन करुन दुचाकीने रोशनखेडा येथील जिनिंग अॅन्ड प्रेसिंगमध्ये जात असतांना वरुड ते रोशनखेडा दरम्यान असलेल्या दादाजी धुनिवाले मंदीर नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक प्रकाश वनखडे (२५) व मागे बसलेला रंजु उदारसिंग बनके (२०) हे गंभिररित्या जखमी झाले. रस्त्यावर अंधार असल्यामुळे तब्बल १ तासापर्यंत दोघेही रस्त्यावरच पडून होते परंतु रस्त्याने ये-जा करणा:या कुणीही त्यांना मदत केली नाही किंवा वाहने सुध्दा थांबविली नाही. ही बाब सुरळी येथील युवकांना समजल्यानंतर ऋषीकेश राऊत, अर्जून डंबाळे, नितीन नथीले, किशोर चंबोळे, पुरुषोत्तम पवार, किशोर हेलोडे, किशोर निकम, सुनिल पवार, विक्की दंडाळे यांना समजताच या युवकांनी गावातून ऑटो काढला आणि थेट घटनास्थळावर पोहचले. गंभिरावस्थेत दोन्ही जखमींना तातडीने ऑटोमध्ये टाकून वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी प्रकाश वनखडे यांची प्रकृती गंभिर असल्याने त्याला अमरावतीच्या ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी अद्याप पोलिसांत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. युवकांनी केलेल्या मदतीमुळे जखमींना तातडीने उपचार मिळाल्यामुळे या युवकांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
९ जानेवारी
वरुड – येथून रोशनखेडाकडे दुचाकी जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर दोघे जखमी झाल्याची घटना रात्री ७.३० च्या सुमारास वरुड ते रोशनखेडा दरम्यान घडली. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभिर असून दोघेही मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
प्राप्त माहीतीनुसार, वरुड येथून मद्य प्राशन करुन दुचाकीने रोशनखेडा येथील जिनिंग अॅन्ड प्रेसिंगमध्ये जात असतांना वरुड ते रोशनखेडा दरम्यान असलेल्या दादाजी धुनिवाले मंदीर नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक प्रकाश वनखडे (२५) व मागे बसलेला रंजु उदारसिंग बनके (२०) हे गंभिररित्या जखमी झाले. रस्त्यावर अंधार असल्यामुळे तब्बल १ तासापर्यंत दोघेही रस्त्यावरच पडून होते परंतु रस्त्याने ये-जा करणा:या कुणीही त्यांना मदत केली नाही किंवा वाहने सुध्दा थांबविली नाही. ही बाब सुरळी येथील युवकांना समजल्यानंतर ऋषीकेश राऊत, अर्जून डंबाळे, नितीन नथीले, किशोर चंबोळे, पुरुषोत्तम पवार, किशोर हेलोडे, किशोर निकम, सुनिल पवार, विक्की दंडाळे यांना समजताच या युवकांनी गावातून ऑटो काढला आणि थेट घटनास्थळावर पोहचले. गंभिरावस्थेत दोन्ही जखमींना तातडीने ऑटोमध्ये टाकून वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी प्रकाश वनखडे यांची प्रकृती गंभिर असल्याने त्याला अमरावतीच्या ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी अद्याप पोलिसांत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. युवकांनी केलेल्या मदतीमुळे जखमींना तातडीने उपचार मिळाल्यामुळे या युवकांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

Related Articles

Back to top button