मराठी

दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील पुलावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यु

कंत्राटदाराचा निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत असल्याचा नातेवाईकांचा आरोप

अंजनगाव सुर्जी/दि.२१ – तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हिरापुर  येथिल युवक अविनाश मिसार काल दि. २० ला अकोला येथुन परत येत असतांना दर्यापूर येथिल अंजनगाव रोडवरील पेट्रोल पंपाच्या जवळ चालु असलेल्या पुलाच्या बांधकाम मुळे अंदाज न आल्यामुळे अपघात होऊन जागिच मुत्यु झाला अविनाश च्या अपघाताला कंत्राटदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईक करित आहेत.
      संपुर्ण जिल्ह्यातील रस्ताची कामे चालू असुन त्याचप्रमाणे दर्यापुर ते अंजनगाव सुर्जी मार्गाचेसुध्दा काम चालू असुन या मार्गाचे काम करत असलेले कंत्राटदार काम करत असताना कुठल्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचे जाणवते त्याचप्रमाणे पुलाचे काम चालू असताना त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचे ब्यारिकेट्स सुरक्षेतेच्या दुष्ठीने लावले नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही व अपघात होतो त्याचाच बळी  तालुक्यातील हिरापूर येथिल रहिवाशी अविनाश वासुदेवराव मिसार वय ३० वर्ष याचा काल रात्री १०वाजताच्या सुमारास पुलावरुन खाली पडल्याने मृत्यू झाल्या.  शवविच्छेदन करण्यासाठी दर्यापूर येथिल उपजिल्हा रुग्नालयात पाठविण्यात आला होता. तर त्याच्या  मागे बसलेले व्यक्ती
 विज वितरण कंपनी मध्ये कार्यरत असलेला पचघरे हे जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे‌. हे
दोन्ही व्यक्ती अकोला येथून  काम आपटुन  आपल्या दुचाकी क्र. एम एच २७ बिसी ५८१० स्प्लेंडर  गाडी ने घरी येत असतांना रात्री ९ ते १० च्या सुमारास पुलावरून  खाली पडून अपघात झाला.
 अमरावती जिल्ह्यामध्ये मुख्य रस्त्यांचे बांधकाम अतिशय मंद  गतीने सुरू आहे. अंजनगाव  ते दर्यापूर मार्गावरील गेल्या आठ ते दहा  महिन्यांपासून या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.   काम चालू असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलीही ठिकाणी बॉरिकेट्स  सुद्धा लावण्यात आलेले  नाही. सुरक्षिततेता नसल्याने च अपघात झाला चा आरोप मुत्युकाचे नातेवाईक करित आहे.
 सदर घटनेचा पंचनामा  दर्यापूर पोलिसांनी कला असुन पुढिल तपास करित आहेत.

Related Articles

Back to top button