यवतमाळ/दि. २२ – काही तोतया व्यक्तीकडून बनावट पदस्थापनेचा आदेश तयार करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांचे बनावट सहीनिशी शिक्के तयार करून त्याद्वारे लोकांची फसवणुक केल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु अशा प्रकारची कोणतीही पदभरती जिल्हा परिषद, यवतमाळ कडून राबविल्या गेली नसून कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.
तसेच तोतया लोकांनी तयार केलेल्या बनावट नियुक्ती आदेशास कोणीही बळी पडू नये. असा प्रकार संबंधीतांबाबत झाल्यास त्याची माहिती पुराव्यासह तात्काळ यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनास द्यावी, जेणेकरून संबंधीत तोतया व्यक्तीविरुध्द नियमानुसार पुढील फौजदारी स्वरूपाची कारवाई करता येईल. किंवा आपण याबाबत स्वत: फौजदारी कारवाई करावी. जेणेकरून अशा तोतया व्यक्तीकडून सर्वसामान्य जनतेची फसवणूक होणार नाही, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.