मराठी

‘उबर‘ ची आता रिक्षा भाड्याने देण्याची सेवा

१० किलोमीटरचा प्रवास १६९ रुपयांमध्ये करता येईल

मुंबई/दि. २६ – ‘उबर‘(Uber) ने आता देशात रिक्षा भाड्याने देण्याची सेवा सुरू केली आहे. या सेवेंतर्गत मुंबईमध्ये एक तासासाठी किंवा १० किलोमीटरचा प्रवास १६९ रुपयांमध्ये करता येईल. अशी भाड्याने रिक्षा सेवा देणारी ही पहिली कंपनी आहे, असा दावा केला असला, तरी ओला आधीच ऑटो सव्र्हिस देत आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, एनसीआर इत्यादी ठिकाणी ही सेवा उपलब्ध असेल. बुधवारी जारी केलेल्या निवेदनात ‘उबर‘ ने म्हटले आहे, की दिवसातून दोन तास तास, दिवसातून सात तास अथवा अन्य मागणीनुसार वाहन भाड्याने सेवा देणारी ही पहिली कंपनी आहे. याअंतर्गत प्रवासी अनेक तास ऑटो आणि ड्रायव्हर एकत्र बुक करू शकतात.
सध्या मुंबईत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. बंगळूर, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे येथेही सेवा उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले, की रिक्षा सर्वांसाठी पसंतीचे वाहन आहे. दररोज कोट्यावधी भारतीय ते वापरतात. याबाबत उबर प्रवर्गाचे प्रमुख नितीश भूषण म्हणाले, की आता शहरे खुली होत आहेत. आम्ही प्रवाशांच्या गरजा समजून घेत आहोत. कोणीही एक तास किंवा त्याहून अधिक वेळेसाठी ऑटो बुक करू शकते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही कमी किंमतीत ही सुविधा देत आहोत. त्यामध्ये आरोग्याची काळजीही घेतली जाईल.

सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन चेकलिस्ट, मुखपट्टी आवश्यक, प्रवासापूर्वी ड्रायव्हरचा मुखपट्टी पडताळणीचा सेल्फी, ड्रायव्हरचे शिक्षण आवश्यक आहे तसेच सुरक्षितता नसल्यास प्रवाशी रिक्षा रद्द करू शकतात. ‘उबर‘ने मुखवटे, सॅनिटायझर्स आणि इतर सुरक्षिततेच्या वस्तूंसाठी जागतिक पातळीवर पन्नास लाख डॉलर्स दिले आहेत. आधीच भारतात, कंपनीने ७० शहरांमधील वाहनचालकांना सुरक्षा उपकरणे पुरविली आहेत. गेल्या महिन्यातच उबर आणि बजाज यांनी सेफ्टी स्क्रीनसाठी भागीदारी जाहीर केली. कंपनीने एक लाख ऑटो रिक्षांना सेफ्टी किटचे वाटप केले

Related Articles

Back to top button