अंजनगाव सुर्जी/दि.१५ -तालुक्यातील शेतकरी तालुका कृषि कार्यालयात पिक विमा बाबत तक्रारी देण्यासाठी कार्यालयात जात आहे पंरतु आपल्या कार्यालयात शेतकऱ्यांना उध्दट वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे जर शेतकऱ्यांन सोबत उध्दट वागणूक देत असाल तर याद रखा असे अलीटेमेंट प्रहारचे उपजिल्हा प्रमुख शंभु मालठाणे यांनी तालुका कुषि अधिकारी यांना दिले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पिक विमा संदर्भात आपल्या कार्यालयात तक्रारी येत असुन त्या आपण स्विकारत नाही या बाबत प्रहार कडे तक्रारी येत आहे आपण तक्रारी का स्विकारत नाही याबबत सविस्तर माहीती देवुन विमा प्राप्त न झाल्याच्या तक्रारी तालुका कृषि कार्यालयाने स्वीकाराव्या व त्यांना विमा रक्कम मिळवून देणे हि जबाबदारी आपल्या कार्यालयाची आहै शेतकऱ्यांच्या कामाविषयी आपली भूमिका सकारात्माक घेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर प्रहार स्टाँईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहारचे उपजिल्हा प्रमुख शंभु मालठाणे यांच्या नेतृत्वात प्रमुख ,बाडु रोंघे , आकाश खारोड़े, सत्यपाल धुमाले, निकेश उम्बरकर, ऋषभ धुमाले बंटी इंगोले, कौस्तुभ पाटील,अमोल शिंगणे,बंदु डांगरे,शिवदास रोंघे ,शैलेश जवंजाल, गोपाल शिंगणे ,पुरषोत्तम नेटकर, गणेश रोंघे