मराठी
उन्नत भारत अभियानांतर्गत पाच दत्तक गावांचा सर्वसमावेशक विकास होणार
अमरावती विद्यापीठाचा पुढाकार
अमरावती दि १२ – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत विभागीय समन्वय संस्थाचे कार्य सुरु असून कोरोना काळात ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विभागीय समन्वय संस्थेची नुकतीच सभा झाली. या सभेमध्ये दत्तक घेतलेल्या अमरावती जिल्ह्रांतील चिखलदरा तालुक्यातील चिचाटी, अचलपूर तालुक्यातील सावली दतुरा, नांदगांव खंडे·ार तालुक्यातील पिंपळगांव (बयनाई), अकोला जिल्ह्रातील मुर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा, उदयगांव येथील मासा सिसा या दत्तक गावांचा पहिल्या टप्प्यात सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेमध्ये दत्तक गावातील सामथ्र्य आणि दुर्बलता हे मुद्दे विचारात घेवून विकास करण्याचे ठरविण्यात आले. गावात असलेल्या समस्यां, ज्यामध्ये पाणी, रोजगार, कौशल्य, व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ, सिंचन आदी व्यवस्थेचा अभाव तसेच गावामध्ये असलेली नैसर्गिक उपलब्ध संसाधने, पाण्याची सुविधा, सुपिक जमीन, बाजारपेठ, युवावर्ग, दळणवळण सुविधा, शेतमाल साठवणुकीची व्यवस्था, पशुधन, दुध संकलन केंद्र, महिला बचत गटाद्वारे संचालित लघुउद्योग, याकरीता असलेले आवश्यक कौशल्य तथा प्रशिक्षणाचा अभाव, आदी बाबी लक्षात घेण्यात आल्यात.
सभेमध्ये दत्तक गावातील सामथ्र्य आणि दुर्बलता हे मुद्दे विचारात घेवून विकास करण्याचे ठरविण्यात आले. गावात असलेल्या समस्यां, ज्यामध्ये पाणी, रोजगार, कौशल्य, व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ, सिंचन आदी व्यवस्थेचा अभाव तसेच गावामध्ये असलेली नैसर्गिक उपलब्ध संसाधने, पाण्याची सुविधा, सुपिक जमीन, बाजारपेठ, युवावर्ग, दळणवळण सुविधा, शेतमाल साठवणुकीची व्यवस्था, पशुधन, दुध संकलन केंद्र, महिला बचत गटाद्वारे संचालित लघुउद्योग, याकरीता असलेले आवश्यक कौशल्य तथा प्रशिक्षणाचा अभाव, आदी बाबी लक्षात घेण्यात आल्यात.
वीट भट्टी, फळ उद्योग, दालमील, रोजगारासाठी इलेक्ट्रीकल्स, मॅकेनिकल्स वर्कशॉप, कृषिवर आधारित उद्योग, सोलर प्लॅन्टच्या माध्यमातून उर्जेचे नूतनीकरण व त्याचा दैनंदिन वापर यांसह सर्वसमावेशक शिक्षणाची व्यवस्था, या ग्रामीण विकासाच्या योजनांवर अभ्यास करण्यात आला. दत्तक गावातील उपलब्ध संसाधनाचा वापर करुन गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्याकडून कृषिवर आधारित उद्योग तथा कौशल्य विकासाचे नियोजन, तंत्रज्ञानाच्या आधारे फळप्रक्रियेवर आधारित उद्योग, उपलब्ध वनस्पतीच्या आधारे वैद्यकीय उद्योग, कृषिवर आधारित वीज निर्मिती, प्रायोगिक तत्वावर बीज उपलब्ध करुन देणे, जैविक खत निर्मिती, याकरीता प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे व त्याचबरोबर विद्यापीठाकडे असलेल्या ग्रामविकास तथा उद्योजकता विकासाकरीता शासकीय योजनेसंदर्भातील माहिती तथा आवश्यक ती संसाधने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी अकोला विद्यापीठाने स्वीकारली आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी दुग्धसंकलन केंद्र, डेअरी फार्म, कौशल्य विकास, पशुधन तथा मत्स्य व्यवसाय, दुग्धप्रक्रियेवर आधारित मिल्क बाय प्रोडक्ट आदींबाबत प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरीता प्रयत्न करणार आहेत.
उद्योजकता विकास तथा मॉडेल ग्रामविकास योजनेमध्ये सदर गावांचा समावेश सुद्धा होणार असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकाराचे फलित पूर्णत्वास येत आहे. कोव्हिड 19 च्या पा·ाभूमीवर ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी घटल्या असून त्या वाढविण्यासाठी व कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशाचा कणा ग्रामीण भाग असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाचा पुढाकार मैलाचा दगड ठरणार आहे. संपूर्ण विदर्भ व मराठवाड¬ातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये यांच्या सहभागाने ग्रामीण विकासाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.