मुंबई दी २- सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (CMR) जाहीर केलेल्या नवीन बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार भाजपशासित राज्यांच बेरोजगारी जास्त आहे. त्यात काँग्रेसच्या राजस्थनचा ही बेरोजगारी जास्त असलेल्या राज्यांत समावेश आहे.
ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारी 10 टक्के होती. या महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर औपचारिक क्षेत्रात सर्वांत वाईट होता. टाळेबंदीनंतर जुलैमध्ये बेरोजगारीच्या आकडेवारीत घट झाली. टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची अपेक्षा होती; परंतु सीएमआयने जाहीर केलेल्या बेकारीच्या आकडेवारीनुसार त्यात सुधारणआ झाली नाही. आकडेवारीनुसार, शहरी बेरोजगारीचा दर जुलैमध्ये 7.१5 टक्के होता; परंतु ऑगस्टमध्ये हा आकडा 9. 83 टक्के झाला आहे. बेरोजगारीचा दर 9.83 टक्क्यांपर्यंत पोहोचला म्हणजे शहरी भागातील 10 पैकी एकाला नोकरी मिळत नाही.
ग्रामीण भागातही परिस्थिती तशीच आरे. बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 6.66 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हरयाणा राज्य बेरोजगारीच्या बाबतीत सर्वांत वाईट आहे, राज्यात बेरोजगारीचे प्रमाण 33. 33 टक्के आहे. त्यापाठोपाठ त्रिपुराचा क्रमांक असून तेथे बेरोजगारीचा दर 27.9 टक्के आहे. राजस्थान आणि गोव्यातील बेरोजगारीचे प्रमाण अनुक्रमे १5.5 आणि 16.२ टक्के आहे.