मराठी

देशात पुन्हा वाढली बेरोजगारी

मुंबई दि २७ – नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर 7.8 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या ताज्या अहवालानुसार या कालावधीत कामगार सहभाग दर (एलपीआर) 39 टक्के टक्के होता, त्यामुळे रोजगार दर झपाट्याने 6.24 टक्क्यांवर घसरला. जूनअखेरपर्यंत रोजगाराचा हा दर सर्वांत कमी आहे.
सीएमआयईने आपल्या अहवालात म्हटले आहे, की टाळेबंदीपूर्वी रोजगाराचे प्रमाण अद्याप पातळीवर पोहोचलेले नाही. उलट ते पुन्हा कोसळू लागले आहे. 2019-20 मध्ये रोजगार दर 39.4 टक्के होता. एप्रिलमध्ये ती घसरून 27.2 टक्क्यांवर आली आहे. मेमध्ये ती 20.2 टक्के झाली आणि ऑक्टोबरमध्ये ती  37.8 टक्क्यांवर गेली. नोव्हेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत त्यात सातत्याने घट झाली आहे. पहिल्या आठवड्यात 37.7 टक्के, दुस-या आठवड्यात 37.4 टक्के आणि तिस-या आठवड्यात 36.2 टक्के रोजगारीचा दर होता. ताज्या बेकारीचा दर 5 आठवड्यांत सर्वाधिक आहे. गेल्या आठवड्यात ७.8 टक्के बेरोजगारीचा दर पूर्वीच्या तुलनेत साडेपाच टक्क्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. गेल्या चार आठवड्यांत बेरोजगारीचे प्रमाण 5.5 ते 7.2 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

Related Articles

Back to top button