मराठी
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नाला बांधकामात नगरपरिषद चे अक्षम्य दुर्लक्ष
चांदुर रेल्वे/ दि.२६ – प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगर परिषद द्वारा लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत दिनांक 12 6 18 रोजी निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या त्यात प्रभाग क्रमांक सात मधील गोदावरी नगर येथील नाला बांधकाम होते परंतु सदर काम अचानक नगर परिषद ने दिनांक एक 1. 8. 18. रोजी रद्द केले व तेथूनच सदर कामाला ग्रहण लागले त्यानंतर दिनांक 6 9 2018 रोजी सर्वसाधारण सभेत विषय दहा अन्वय सादर नाला बांधकाम निधी उपलब्ध होताच प्राधान्याने करण्यात येईल असे ठरविण्यात आले होते त्यानंतर नगरपरिषद ने दिनांक 12 6 2018 रोजी च्या 11 निविदा प्रसिद्धी केल्या त्या निविदा रद्द करण्याचे मा उच्च न्यायालयाने आदेश दिले व निविदा पूर्ण प्रसिद्ध करावेत असे निर्देश दिले त्याबाबत जानेवारी 2020 रोजी निविदा पूर्ण प्रसिद्ध झाल्यात परंतु त्यात गोदावरी नगर येथील नाला बांधकाम हेतू परस्पर टाळण्यात आले परंतु सदर गोदावरी नगर येथील नाला बांधकाम निधी उपलब्ध असतानासुद्धा निविदा प्रसिद्ध न करणे हे राजकीय हेव्यादाव्यांमुळे दुर्लक्षित झाल्याचे दिसत आहे प्रभाग क्रमांक 7 ची नगरसेविका सौ स्वाती मेटे यांनी या यासंदर्भात जिल्हाधिकारी अमरावती यांना व नगरपरिषद ला वारंवार तोंडी व लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा राजकीयदृष्ट्या महिला नगरसेवकास त्रास देण्याच्या दृष्टीने राजकीय नेत्यांचे आदेश दिसून येत आहे सदर नाला बांधकाम होणार की नाही ही अशी विचारणा प्रभागातील नागरिक करीत आहे.
वारंवार प्रयत्न करून सुद्धा नगरपालिकेत द्वारा रीतसर ठराव पारित होऊन त्यानंतर निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही त्यानंतर पुन्हा सर्वानुमते ठराव पारित होऊन प्राधान्य काम करण्याचे ठरले परंतु पुरेसा निधी मध्ये शिल्लक असताना सुद्धा अधापफवतो निविदा करण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखविले नाही