मराठी

केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक कोविड पॉझिटिव्ह

आज तब्येत आणखी खालवली

पणजी/दि.२४– उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय आयुष मंत्री तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री (Union Minister of State for Home) श्रीपाद नाईक (Shripad Naik) हे कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना दहा दिवसांपूर्वी एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
सोमवारी दुपारी त्यांची तब्येत आणखी खालावली असून भारतीय संरक्षण दलाच्या इस्पितळातील एक पथक आणि एम्सचे एक पथक सायंकाळपर्यंत गोव्यात पोहचत आहे. या पथकाने तपासणी केल्यानंतरच त्यांना दिल्लीत हलविण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Savant) यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सकाळपासून त्यांची ऑक्सिजनची पातळी उतरल्याचे ते म्हणाले.
श्रीपाद हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीही आहेत. गोव्यात असताना त्यानी कोविड तपासणी करून घेतली व त्यात ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना दोनापावल येथील या खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. गेले दहा दिवस ते येथे उपचार घेत आहेत.

Related Articles

Back to top button