मराठी

विद्यापीठातील कोरोना प्रयोगशाळा अमरावतीकरांसाठी वरदान – कुलगुरू

विद्यापीठ स्वातंत्र्य दिनी कोरोना योद्धांचा कुलगुरूंचे हस्ते सत्कार

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली प्रयोगशाळा अमरावतीकरांसाठी वरदान व जीवनदायी ठरली असून या प्रयोगशाळेत कार्यरत विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थी हे ख­याअर्थाने योद्धा असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले.  भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर कोरोना प्रयोगशाळेत कार्यरत शिक्षक व विद्याथ्र्यांचा कुलगुरूंचे हस्ते सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी कुलगुरू बोलत होते.  यावेळी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख उपस्थित होते.
कुलगुरू म्हणाले, कोरोनासारखी महाभीषण परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाल्यानंतर अमरावती जिल्ह्रात सुरुवातीला कोरोना आजाराची चाचणी करण्याकरीता प्रथमत: विद्यापीठात प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली.  प्रयोगशाळा स्थापन झाल्याने चाचणीचे अहवाल प्राप्त होण्यास गती आली आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य झाले, त्याचा परिणाम म्हणून मृत्युदर कमी होवून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले.  या प्रयोगशाळेत विद्यापीठातील शिक्षक डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. निरज घनवटे, डॉ. प्रशांत गावंडे यांचेसमवेत एम.डी. पॅथॅलॉजी डॉ. मुकेश बारंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक विभागातील विद्यार्थी कार्यरत असून ते अहोरात्र परिश्रम करीत असल्यामुळे चाचणी अहवाल तपासणीला मोठी गती प्राप्त होवू शकली.  एकीकडे लोकांना कोरोनामुळे आपल्या जीवाची भिती असतांना प्रयोगशाळेत कार्यरत शिक्षक व विद्यार्थी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचा जीव कसा वाचेल, यासाठी सातत्याने परिश्रमपूर्वक कार्य करीत आहे, हे निश्चितच आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून कोरोना योद्धे करीत असलेल्या महान कार्याबद्दल कुलगुरूंनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. प्रशांत गावंडे म्हणाले, सुरुवातीला सॅम्पल तपासणीचे काम कमी होत होते, परंतु जशीजशी अद्ययावत यंत्रसाम्रगी शासनाकडून प्राप्त झाली, तसतसा कामाचा वेग वाढला.  लवकरच ऑटोमेटेड आर.एन.ए. एक्सट्रकशन सिस्टीम स्थापित होत आहे.  याशिवाय आर.टी.पी.सी.आर. च्या दोन मशीनसह पी.डी.एम.सी. मधून कॉन्ट स्टुडीओ-5 ही मशीन अमरावती जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करुन दिल्यामुळे दररोज पाचशेच्या वर सॅम्पल तपासले जातील.  आजपर्यंत जवळपास बावीसहजार चाचण्या केल्याची माहिती त्यांनी दिली.  प्रयोगशाळेत विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील कार्यरत संशोधक व विद्यार्थी भूक, तहान याची तमा न बाळगता रात्रंदिवस कार्य करीत आहे, त्यांनी एकही दिवस सुट्टी सुद्धा घेतली नाही.  ते विद्यापीठाला व पर्यायाने समाजाला देत असलेली सेवा अमूल्य असल्याचे ते म्हणाले.  याप्रसंगी प्रयोगशाळेत कार्यरत योगेश बेले, कु. पुजा मांडवीया, यश गुप्ता, अश्विनी देशमुख, निलु सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन त्यांचे अनुभव कथन केले.
कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी याप्रसंगी पुष्प देवून कु. निलु सोनी, कु. पुजा मांडवीया, योगेश बेले, अक्षय शेंडे, कु. राधिका लोखंडे, कु. अमृता कासुलकर, यश गुप्ता, सचिन अवचार, वेदप्रकाश नंदनवार, कु. मयुरी गहरवाल, कु. अश्विनी  देशमुख, कु. रेश्मा धर्माळे, स्वप्नील तेलंगे, कु. निकिता धर्माळे, प्रविण नेवारे, सागर भटकर तसेच डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. मुकेश बारंगे या कोरोना योद्धंचा सत्कार केला, तर डॉ. सुधीर शेंडे यांचा सत्कार विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आला.  यावेळी अॅड. पद्मा चांदेकर, माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. भारत क­हाड, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एफ.सी. रघुवंशी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button