भारतीय सीमेवर चीनचे साठ हजार सैन्य तैनात अमेरिकेची माहिती
दोन्ही देशांच्या कोप्र्स कमांडर्सची उद्या बैठक
वॉशिंग्टन/दि.१० – भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्य कमी करण्यासाठी भारतीय आणि चिनी कोप्र्स कमांडर्सची बैठक १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पूर्वे लडाखमधील सर्व संघर्ष स्थळांवरून सैन्य हटविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. भारत आणि चीनमधील कोप्र्स कमांडर स्तरावरील चर्चेची ही सातवी फेरी असेल. भारत-चीन सीमेवर तणाव असताना सीमेरेषेनजीक साठ हजारांहून अधिक सैन्य तैनात केले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारत आणि चीनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये सीमा विवाद सुरू आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पोम्पिओ यांनी सीमेवर असलेल्या तणावाबद्दल चीनवर टीका केली आहे. बीजिंग क्वाड देशांसाठी धोका बनला आहे. इंडो-पॅसिफिक देशांचे परराष्ट्र मंत्र्यांचे गट क्वाड म्हणून ओळखले जातात. या गटात भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. मंगळवारी जपानमधील टोकियो येथे या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिली बैठक होती. पूर्वेकडील लडाखमधील प्रत्यक्षव नियंत्रण रेषेवर चीनची आक्रमक लष्करी वृत्ती आणि भारताशी असलेला तणावावर परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली.
चीनने भारतीय सीमेवर साठ हजार सैन्य तैनात केले आहे. पोम्पिओ म्हणाले, की गेल्या आठवड्यात मी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील माझ्या सहका-यांसमवेत होतो. मी क्वाड परिषदेला गेलो होतो. ज्यात मोठ्या लोकशाही आणि शक्तिशाली अर्थव्यवस्था असलेले चार देश समाविष्ट आहेत. या प्रत्येक देशाला चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून धोका आहे. पोंपिओ टोकियो येथे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीला फलदायी म्हटले आहे. पूर्व लडाखमध्ये चीनच्या आडमुठी वृत्तीमुळे हे तणाव अजूनही कायम आहे. दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर तैनात आहेत. कोअर कमांडर्सच्या बैठकीत पूर्व लडाखमधील सद्यस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच भारताने उपस्थित केलेल्या मुख्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सीएसजीमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ qसह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि लष्कराच्या तिन्ही विभाग प्रमुखांचा समावेश आहे. सोमवारी होणा-या कोप्र्स कमांडरच्या बैठकीत लेह येथील १४ व्या कोर्सेसचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर qसग हे भारतीय पथकाचे नेतृत्व करतील.