मराठी
मेनच्या शेजारी भारताच्या कारवाईमागे अमेरिकेचा हात
- चीन बीजिंग दी २- एकीकडे बैठका सुरू असताना दुसरीकडे मात्र चीनच्या कुरापती सुरूच आहेत. २९-३० ऑगस्ट रोजी रात्री चीनच्या सैनिकांचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला. त्यानंतर तोंडघशी पडलेल्या चीनने भारतावर आरोप करत भारताच्या कारवाईमागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला.
भारताकडून सीमेबाबत झालेल्या कराराचे उल्लंघन करण्यात आले आणि भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पुढे येण्याचा प्रयत्न केल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला. चीनने तिबेटचाही उल्लेख केला. “दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर आले असले, तरी भारताचा कोणताही जवान हुतात्मा झाला नाही. अमेरिकेतील माध्यमांकडून भारतीय जवान हुतात्मा झाल्याचा दावा करण्यात आला होता,” अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ शुनयिंग यांनी दिली.
भारतीय लष्कराच्या जवानांच्या मदतीसाठी तिबेटी लोकही पुढे आले होते यासंदर्भातही त्यांना सवाल करण्यात आला. यावर प्रवक्त्या भडकल्या आणि याचे उत्तर भारतालाच विचारण्यास त्यांनी सांगितले. तिबेटी लोक आणि सीआयमध्ये अनेक संबंध होते, एवढे आम्हाला माहीत आहे. जे तिबेटी लोकांना शरण देतात त्या सर्व देशांचा आम्ही विरोध करत असल्याचंही त्यांनी नमूद केले. तिबेटच्या प्रकरणावरही लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये अमेरिकेची भूमिका आहे. आता आम्ही भारत आणि तिबेटच्या सैनिकांमध्ये काय संबंध आहेत हे जाणून घेण्यास उत्सुक आहोत,” असे चीनकडून सांगण्यात आले. यापूर्वी चीननं अनेकदा भारतावर आरोप केले होते. अमेरिकेसोबत जाऊन भारत आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबर संबंध अधिक खराब करत असल्याचंही यापूर्वी चीनने म्हटले होते.चीनचा कांगावा
“भारत सतत स्वत:ला खरे सिद्ध करण्याच्या मागे लागला आहे. भारतानेच शनिवारी सर्वप्रथम कराराचे उल्लंघन केले आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला,” असे चीनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.