भारत-चीन सीमेवर अमेरिकेचे न्युक्लिअर बाँबर
न्युक्लिअर बॉम्बर ‘बी-२ स्प्रिंट‘ तैनात केला जाऊ शकते
नवी दिल्ली/दि. १९ – लडाख सीमेवर सुरू असलेल्या भारत–चीन तणावादरम्यान अमेरिका भारताच्या मदतीसाठी पुढे आली आहे. अमेरिकेकडून लवकरच भारत-चीन सीमेवर आपला सर्वांत शक्तीशाली, आधुनिक आणि घातक असा न्युक्लिअर बॉम्बर ‘बी-२ स्प्रिंट‘ तैनात केला जाऊ शकते. हे विमान सध्या अमेरिकेच्या नेवल बेस डियागो गार्सियामध्ये आणण्यात आले आहे. अमेरिकेचे हे विमान एकाच वेळी १६ अणुबॉम्ब घेऊन उड्डाण भरू शकण्यास समर्थ आहे. हे विमान लवकरच भारतीय वायुसेनेसोबत फ्लाय ओव्हर मिशन, युद्धाची तयारी आणि युद्ध रणनीती मोहिमेत सहभागी होऊ शकते.
भारत- अमेरिकेदरम्यान हा संयुक्त सैन्य अभ्यास भारत-चीन सीमेवरच होऊ शकतो. भारतासोबतची मैत्री व्यक्त करण्याशिवाय अमेरिका चीनच्या एअर डिफेन्स सिस्टमलाही जवळून पडताळणी करायची इच्छा आहे आणि भारतीय सीमेवर त्यांना ही संधी मिळणार आहे. सध्या तीन बी-२ हे बॉम्ब वर्षाव करणारी विमाने अमेरिकेच्या नेवल बेस डियागो गार्सियामध्ये तैनात आहेत. हे ठिकाण भारतापासून केवळ एक हजार मैलांच्या अंतरावर आहे. अमेरिकेने याअगोदर याच तळांचा वापर अफगाणिस्तान आणि इराक हल्ल्यांदरम्यान आपल्या विमानांसाठी केला होता. अमेरिका वायुसेनेचे कमांडर कर्नल क्रिस्टोफर कोनंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास २९ तासांचा प्रवास पूर्ण करून डियागो गार्सियाला हे बाँबर आणण्यात आले आहे.
‘अमेरिका आपल्या मित्र आणि सहकाèयांच्या मदतीसाठी किती घातक आणि लांबचे अंतर कोणत्याही क्षणी आणि कुठेही हल्ला करण्यासाठी प्रतिबद्ध आहे,‘ असेही कोनंत यांनी म्हटले आहे. लडाखमधील वादानंतर भारत-चीन दरम्यान तणाव संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही देशांच्या अधिकाèयांमध्ये झालेल्या चर्चेनंतरही चीन पॅन्गाँग सरोवर आणि देपसांग भागातून मागे हटण्यास तयार नाही. इतकेच नाही, तर चीनने लडाखजवळ आपल्या सैन्य ठिकाणावर न्युक्लिअर मिसाईल डीएफ-२६ देखील तैनात केली आहे. त्यामुळे, बी-२ ची थेट टक्कर चीनच्या एअर डिफेन्स सिस्टीमसोबत होईल, असे मानले जात आहे.