मराठी

चीनच्या विरोधात भारत आणणार अमेरिका-रशियाला एकत्र

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अत्याधुनिक शस्त्रांबाबत चर्चा केली

मॉस्को/बीजिंग/दि. २३ – चीनच्या वाढत्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे अमेरिका आणि रशिया(Russia) चीनच्या विरोधात एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या दोन टोकांच्या देशांना भारत एकत्र आणणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता चीन व रशियामध्ये पूर्वीप्रमाणे मैत्रीपूर्ण संबंध राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हाँगकाँगमधील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट‘ने (South china Morning Post)दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे सोव्हिएट रशियाला आव्हान देण्यासाठी चीनला झुकते माप दिले होते, अगदी त्याचप्रमाणे आता ट्रम्प(Donald Trump) चीनविरोधात रशियाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने(America) मात्र अशा प्रकारची शक्यता फेटाळून लावली आहे. रशियाकडून चीनच्या विरोधानंतरही भारताला होत असलेल्या मदतीमुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

रशियाने चीनच्या विरोधानंतरही भारताला शस्त्र पुरवठा केला आहे. गलवान खोरयात झालेल्या संघर्षानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी रशियाचा दौरा करून लढाऊ विमाने व इतर अत्याधुनिक शस्त्रांबाबत चर्चा केली. त्यावरून चीन नाराज आहे. इतकेच नव्हे, तर चीनच्या विरोधानंतरही रशियाने भारताला घातक एस ४०० हे मिसाइल देण्याचे कबूल केले आहे. दुसरीकडे रशियाने चीनला एस ४०० देण्यास टाळटाळ सुरू केली आहे. २०१८ मध्ये रशियाने चीनला एस ४०० ची पहिली खेप दिली होती; मात्र काही महिनेआधी एका रशियन प्राध्यापकाला चीनने हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून अटक केली. त्यानंतर रशिया नाराज असून त्यामुळे एस-४०० ची दुसरी खेप दिली नसल्याची चर्चा आहे. चीनने रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरावर दावा ठोकला आहे. रशियातील हे शहर १८६० पूर्वी चीनचाच एक भाग होता. इतकेच नव्हे, तर या शहराला हॅशनेवाई नावाने ओळखले जात होते. रशियाने हे शहर चीनकडून बळजबरी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला.

चीनचा जळफळाट

भारताने रशियाला इंडो-पॅसिफिक भागात अमेरिकेच्या नेतृत्वातील गटात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. या गटाची स्थापना चीनच्या दादागिरीला रोखण्यासाठी करण्यात आली आहे. रशियाचे परराष्ट्र खात्याचे उपमंत्री इगोर मुर्गुलोव आणि भारताचे रशियातील राजदूत डी बाला व्यंकटेश यांच्या दरम्यान या प्रस्तावावर चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. भारताच्या या प्रस्तावावर चीनचा जळफळाट झाला आहे. रशियाने हे पाऊल उचलणे म्हणजे चीनला धोका देण्यासारखे असल्याचे मत काही चिनी विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. .

Related Articles

Back to top button