मराठी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पुढच्या टप्प्यांत लस

नवीदिल्ली/दि २१  – देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत आठ लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले, की लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस दिली जाऊ शकते.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले होते, की पुढच्या टप्प्यात पन्नासपेक्षा जास्त जास्त वयाच्या राजकारण्यांना लस दिली जाईल. पोलिस, सशस्त्र सेना आणि महापालिका कर्मचारी, आरोग्यसेवा आणि अग्रभागी कामगारांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. यानंतर, ही लस ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना दिली जाईल. कमी वय आहे; परंतु अन्य आजार आहेत, त्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जाणार आहे. आतापर्यंत सरकारी अधिका-यांनी असे म्हटले होते, की ज्येष्ठ नागरिक आणि वडीलधारी व्यक्तींना जास्त लोकांच्या प्रकारात समाविष्ट केले जाईल. याचा अर्थ 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना या गटात समाविष्ट केले जाईल अशी अपेक्षा होती; परंतु हे वय पन्नासवर आणण्यात आले.
पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी यांचे म्हणणे होते, की पाश्चात्य देशांच्या तुलनेत उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार भारतात अकाली वेळी होतो. त्यामुळे पन्नासशेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याचा निर्णय योग्य आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले, की भारतात आतापर्यंत एकूण आठ लाख सहा हजार 484 लोकांना कोरोना विषाणूची लस देण्यात आली आहे.

Back to top button