वरुड/ दि.२४ – आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते राजुरा बाजार येथे तोंडखुरी, पायखुरी रोगनिर्मूलन करण्याकरिता करण्यात आले लसीकरण शिबिराचा शुभारंभ आज करण्यात आला.
राष्ट्रीय पशु रोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत राजुरा बाजार येथील पशु वैद्यकीय दवाखाना येथे राबविण्यात आले. यावेळी जनावरांचे लसिकरणआणि टॅगिंग लावण्यात आले. यावेळी तोंडखुरी व पायखुरी रोगनिर्मूलन माहिती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले तसेच रोग निर्मूलन व टॅगिंग लावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी पशुपालकांनी अधिकाधिक पशूंचे लसीकरण तसेच टॅगिंग करण्याचे आमदार भुयार यांनी आवाहन केले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, जि.प.सदस्य राजेंद्र बहुरुपी, पं.स.सदस्य सिंधु कर्नासे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.रहाटे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.चंद्रशेखर गिरी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ.संयज खेरडे व डॉ.दवंडे, पशुधन पर्यवेक्षक डॉ.जाधवर, लसिकरण सहाय्यक बेले, माजी सरपंच किशोर गोमकाळे, राहुल श्रीराव, गणेश चौधरी, बाबाराव बहरुपी,अमित साबळे, सागर राऊत, निलेश गोमकाळे, राहुल सोनारे, मंगेश तट्टे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.