मराठी

कृषी विज्ञान पदवीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आयोजन

पिंपळखुटा/दि.२७ – कृषी कार्यानुभव अंतर्गत जनावरांचे लसीकरण आयोजन करण्यात आले.यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी ची. स्वराज गी. बंड यांच्या वतीने पावसाळ्याआधी  जनावरांना लसीकरण महत्त्वाचे असल्याने त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .यावळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अखिल बारबुद्धे यांनी जनावरांना लसीकरण केले .प्रात्यक्षिक वेळेत महेंद्र भामकर ,विनोद लोमटे व इतर शेतकरी उपस्थित होते.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डा.ए. आर. ठाकरे,उपप्राचार्य एम. बी कडू ,प्राध्यापिका स्नेहल लोखंडे यांच्या मार्गदर्शनात प्रात्यक्षिक देण्यात आले आहे .
Back to top button