मराठी

कृषि दुताकडुन कोंबड्याचे लसीकरण

कोंघारा येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

वरुड/दि. ९ – येथुन जवळच असलेल्या कोंघारा येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत जरुड येथील दातीर पोल्ट्री फार्मला लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
कृषि दूत शुभम भुपेद्र पोफळे याने लसीकरणाबाबत मार्गदर्शन करतांना सांगितले की, कोंबड्यामध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठया प्रमाणात मारतुक होते. ज्या कोंबड्या या आजारातून ब:या होतात, त्या अंडी देणे बंद करतात सफल अंड्याचे प्रमाण कमी होते, या आजाराचा प्रादुर्भाव माणसांना देखील होते. कंजक्टायव्हीटीस (डोळे येणे) हा आजार होते. मानमोडी या आजारावर रोगप्रतिबंधक हाच चांगला उपाय आहे. कोंबड्यामधील मानमोडी या आजाराला राणीखेत किंवा न्यू कॅसल डिसीज देखील म्हणतात. हा आजार अतिशय संसर्गजन्य असून सर्व भागात आढळते. हा रोग लॅटोजेनिक, मेसोजनिक आणि व्हेलोजेनिक विषाणूपासून होतो. विषाणू कोंबड्याच्या वेगवेगळया अवयावर परिमाण करतात. या आजारावर कोणतेही खात्रीलायक उपचार नाहीत. आजार होवु नये म्हणून पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली अटीबायोटीक्सचा वापर करावा. लासोटा लस ५ ते ७ दिवस वयाच्या पिलांना देण्यात यावी. १५ दिवसानंतर आय.बी.डी.बुस्टर आणि २१ दिवसानंतर लासोटा बुस्टर देणात यावी.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रेवतकर, प्राध्यापक एस.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पोल्ट्री फार्मचे मालक अमर दातीर तसेच गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button