मराठी

लस उत्पादक कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर

पुणे/दि.२ – आपल्या हॅकर्सच्या मदतीनेचीननेमुंबईचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर आता चिनी हॅकर्सनी भारतातील लस उत्पादक कंपन्या आणि औषध कंपन्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालविला आहे. डिजिटल जगातील या गुन्ह्यात केवळ चीनच नाही तर रशिया आणि कोरियामधील हॅकर्सचाही समावेश आहे.
चिनी, रशियन आणि उत्तर कोरियाच्या हॅकर्सने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय), भारत बायोटेक, झेडस कॅडिला आणि एम्स यांच्यासह शीर्ष फार्मास्युटिकल आणि लस उत्पादकांना लक्ष्य केले. सायबर इंटेलिजन्स फर्मसाय फर्मा कंपनीनेही माहिती दिली आहे. भारत बायोटेक आणि सीरमने भारतात कोरोना लसी तयार केल्या आहेत. झाइडस कॅडिलानेकोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी घेतली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ही देशातील सर्वोच्च सार्वजनिक रुग्णालय व संशोधन केंद्र आहे. 24 आणि 26 फेब्रुवारी दरम्यान हॅकर्सपासून जागतिक आरोग्य सेवा कंपन्यांना धोक्याचा इशारा दिला होता. हे सायबर रशिया, चीन आणि उत्तर कोरियामध्येअसलेल्या तीन राज्य-पुरस्कृत हॅकर्सने केले आहेत. भारताव्यतिरिक्त अमेरिका, बि‘टन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, इटली, स्पेन, जर्मनी, ब्राझील, तैवान आणि मेक्सिकोमध्येही आरोग्य सेवा कंपन्यांना लक्ष्य केले गेले आहे. अहवालात असे म्हटले आहे, की हॅकिंग गटांना कोरोना या लसीशी संबंधित डेटा चोरी करायचा आहे. यात लस संशोधन, वैद्यकीय रचना, क्लिनिकल चाचणी माहिती, लस रसद आणि वितरण योजनांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या एका अहवालात असेम्हटले गेलेआहे, की गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईतील पॉवर कट (ब्लॅकआऊट) मध्येचीनचा हात आहे. मुंबईतील ब्लॅकआउट हा गलवानच्या चकमकीशी संबंधित आहे. त्यात म्हटलेआहे, की गलवान हिंसाचारानंतर लडाखमध्येप्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला भारताला हा निरोप पाठवायचा आहेकी, जर भारतानेअधिक काटेकोरपणा दाखविला तर संपूर्ण देशाला ब्लॅकआऊटचा सामना करावा लागेल. चिनी हॅकर्सच्या सैन्यानेऑक्टोबरच्या पाच दिवसांत भारताच्या पॉवर , आयटी कंपन्या आणि बँकिंग क्षेत्रात सायबर केला होता. या अभ्यासानुसार भारताच्या पॉवर  विरोधात सर्वसमावेशक चिनी सायबर मोहीम राबविण्यात आली. चीन हे दर्शविण्याचा प्रयत्न करीत होता की, जर सीमेवर त्याविरूद्ध कारवाईकेली, तर तेभारताच्या वेगवेगळ्या पॉवर मालवेयर करून भारत बंद करेल.

Back to top button