मराठी

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या विविध बैठका

पुनवर्सन अंतर्गत येणाऱ्या गावांचा व तिवसा नगर पंचायत विकास कामांचा घेणार आढावा

अमरावती, दि. 23 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड.यशोमती ठाकूर (District Guardian Minister Adv. Yashomati Thakur)यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी (24 ऑगस्ट रोजी) जिल्हाधिकारी कार्यालयात(Collector Office) सभागृह क्र. एक येथे विविध बैठका होणार आहेत. जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांतील मुलभूत सुविधा संदर्भात व तिवसा नगर पंचायत अंतर्गत विकास कामांचा आढावा पालकमंत्री घेणार आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :

सोमवारी सकाळी 9.55 वाजता अमरावती निवासस्थान येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता विश्रामगृह येथे आगमन व अभ्यांगतांच्या भेटी. दुपारी 1.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व सावरखेड (ता.  भातकुली), खोपडा (ता. मोर्शी), कुंड (अमरावती) येथील पुनर्वसन अंतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांचा आढावा तसेच सद्यस्थितीत स्थानिक स्तरावरील अडचणींबाबत अधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थित सभा. त्यानंतर त्याचठिकाणी दुपारी 3 वाजता तिवसा नगर पंचायत येथील विविध कामांबाबत संबधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. दुपारी 4.15 वाजता कठोरा स्थित पोटे टॉऊनशीप येथील पाणी पुरवठाबाबत तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठा संदर्भात आढावा बैठक घेतील. सायंकाळी 5 वाजता अमरावती निवासस्थान कडे प्रयाण व राखीव.

Related Articles

Back to top button