मराठी

वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली ४३ कोटी ६२ लक्ष रुपयांची मदत ! 

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी होणार साजरी ! 

  • वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा!

वरुड तालुका प्रतिनिधी : आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची कैफियत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असा शब्द दिला होता. वरुड मोर्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून ४३ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या मदतीचा पहिला टप्पा वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करून दिलासा दिला आहे . त्यानुसार दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिल्या जात आहे अशी माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.
वरुड मोर्शी तालुक्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पहिला टप्पा ४३ कोटी ६२ लक्ष रुपयांचा निधी आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वरुड मोर्शी
 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .
पिकांच्या नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यातील निधी मोर्शी तालुक्यास ९कोटी २३ लक्ष रुपये,  वरुड तालुक्यास ३४ कोटी ५३ लक्ष रुपये असा एकूण ४३ कोटी ६२ लक्ष रूपायी निधी प्राप्त झालेला आहे.
मोर्शी वरुड तालुक्याला आवश्यक असलेल्या संपूर्ण रकमेपैकी पहिला टप्पा ४३ कोटी ६२ लक्ष रुपये उपलब्ध करून दिला त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री विजय वडेट्टीवार,पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे आभार आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले .
 वरुड मोर्शी तालुक्यामध्ये जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात अतिृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या नुकसानीसाठी 10 हजार रुपये प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रती हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत  राज्य शासनाने उपलब्ध करून दिली वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ४३ कोटी ६२ लक्ष रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना ही दिवाळी भेट असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पूसण्याचे काम केले आहे प्रत्यक्ष मात्र पूर्व विदर्भात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते त्यांना निश्चितच अनुदान मिळणार होते अमरावती जिल्हा वगळल्या गेला होता परंतु पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यां कडे आणि मी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असताना सुद्धा भेट घेतली आणि वरुड मोर्शी मतदार संघातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई प्राप्त करून दिली आणि आता तर अवकाळी पाऊस जून ते सप्टेंबर 2019,व गारपिटीमुळे जानेवारी 2020 ला झालेले नुकसानिचे पैसे आणि यावेळी जून ते सप्टेंबर पर्यंत झालेल्या नुकसानीचे पैसे वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिडणार आहे

Related Articles

Back to top button