मराठी

वाठोडा शु. ग्राम पंचायत येथे अमोल महात्मे व बुरघाटे च्या पॅनलचेच सरपंच / उपसरपंच

विरोधकांचा धुव्वा

वाठोडा शुक्लेश्वर प्रतिनिधी दि १४ –  भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे गुरुवार रोजी झालेल्या सरपंच / उपसरपंच निवडणूकीत ग्रामपंचायत वर परिवर्तन पॅनल म्हणजेच माजी जिल्हा परिषद सभापती/सदस्य भाष्करराव महात्मे, विश्वासराव बुरघाटे, अमोल महात्मे, जमील भाई, संतोष वि. महात्मे यांच्या पॅनलचेच सरपंच व उपसरपंच सत्तारूढ झालेत.
सरपंच पदी मो. रिजवान अ. गफ्फार तर उपसरपंच पदी सौ. मायाताई बुरघाटे यांची निवड करण्यात आली. त्यांनी या निवडीचे श्रेय पॅनल प्रमुख तसेच ग्राम पंचायतचे नवनिर्वाचित सदस्य बाबाराव मांगे, सुमैय्या परवीन अलिमुद्दिन,जाकीरा बी अहेमद खान, सुर्वाता दिलीप थोरात, खुर्शीद बानो मो. सुबान, सौ. उषाबाई रवींद्र खंडारे, अमित महात्मे, सुनीता सुरेश महात्मे, दिनेश थोरात, क्षितिज डहाके, दिलीप रावेकर, मो. साजीद यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना दिले.
परिवर्तन पॅनलच्या विजयामुळे गावातील कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Back to top button