मराठी

अमरावतीत शुक्रवारी रानभाज्या महोत्सव

पालकमंत्री  एड . यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्धघाटन

अमरावती/ दि. 12 –  कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  एड . यशोमती ठाकूर यांच्या हस्ते श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात शुक्रवारी (14 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता होणार आहे.

रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्व आहे. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असतात. रानावनात, शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणा-या रानभाज्यांची नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे.

महोत्सवात विविध रानभाज्या विक्रीस उपलब्ध होणार आहेत. रानभाज्या महोत्सवात या भाज्यांना ओळख मिळवून त्याची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण करणे शक्य होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल व सर्वसामान्य नागरीकांना रानभाज्यांचे, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती होईल, असे जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button