मराठी

ग्रामसेवकाच्या सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ त्रस्त

ग्रामस्थांचे जिल्हाधिका:यांना निवेदन :कार्यवाहीची मागणी

वरुड दी ३ – येथून जवळच असलेल्या एकदरा येथील ग्रामसेवक सुशील गजभिये सतत गैरहजर असून गावातील संबंधित कारभार खोळंबला असून सदर ग्रामसेवकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी एकदरा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवदेनाव्दारे केली आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, विद्यमान ग्रामसेवक सुशिल गजभिये मागील १२ ते १५ महिन्यापासुन आमचे गाव एकदराला कार्यरत आहे. सदर कार्यवाही कामाचे वेळेपेक्षा अधिक तर दुपारी ४ वाजेनंतर कामावर यायचे मात्र कोरोना काळापासुन ते सतत १५ ते २० दिवसानंतर एकाच वेळेस धावती भेट देत. सध्या या सगळया प्रकारचा साहेबांनी कळसच गावाला धावती भेट सुद्धा दिली नाही. त्यामुळे कोणाचे मयत दाखले, रहिवासी दाखले वा इतर सर्वच कामे खोळंबुन आहे. ग्रामपंचायत कर्मचारीही योग्य उत्तरे देत नाही. तुम्ही आपले घर पहा ग्रामपंचायत आम्ही पाहुन घेवु असे त्रयस्थाप्रमाणे वागतात. यावरुन साहेबांनी आपले कार्यकाळात ग्रामपंचायत आपलेच घर वा मालमत्ता समजुन व बाकी कमेटी अधिकारी हाताशी घेवुन कारभारात आणखी इतर भोंगळ कारभार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन त्यांच्या संपुर्ण कार्यकाळाची चौकशी व्हावी व यथायोग्य चौकशी होवुन त्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसण्यासाठी उचित व कठोर क ार्यवाही करावी, अशी मागणी प्रशांत गुडधे, गजानन सेवतकर, गणपत इंगळकर, संजय तळखंडे, वसंत पुंडकर, एकनाथ इंगळकर, हरिदास पावडे, मनोज कोल्हे, प्रविण वंजारी, विठ्ठल फांदडे, पांडुरंग सातपुते, महादेवसिंग वंजारी, नारायण भोंगाडे, सतिश बानाईत, गणेश वंजारी, दिलीप चौधरी, रामचंद्र राऊत, अतुल धोटे, रामचंद्र वंजारी, कमलकर भोंगाडे, श्रीराम भोयर, राजु इंगळकर, अजय येऊतकर, सुभाष गायधने, पुंडलिक चौधरी, सुनिल वंजारी, उमेश यावले, विजय हिवसे, संदीप इंगळकर, गणेश चंदेल, किमना कळंबे, ईश्वर सोमकुंवर, सुभाष बानाईत, राधेश्याम ठाकरे, दिपक व:होकर, किशोर कोल्हे आदींनी केली आहे.

Related Articles

Back to top button