मराठी
कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांची तगमग दर्शविणारा ‘व्हायरस २०२०’ -लघुपटाचे लोकार्पण
अमरावती/दि १७ :- पूर्ण काळजी घेवूनही कोरोनाची लागण झाल्यावर कोरोनाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबियाची होणारी तगमग दर्शविणारा चित्रपट ‘व्हायरस २०२०’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आहे. या चित्रपटाचे लोकार्पण नुकतेच माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, मा.श्री.एम. टी. देशमुख(जेष्ठ रंगकर्मी), भाजपचे रविराज देशमुख आदिंची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच हा लघुपट नागरिकांनी बघण्याचे आवाहन केले. या लघुपटासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे , जि.प डेप्टी सी.ई.ओ. श्रीराम कुळकर्णी, रविराज देशमुख, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख,संध्या टिकले, कुणाल टिकले, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे, डॉ. शाम देशमुख, प्रदिप एडतकर आदिंनी ध्वनी चित्रफितीद्वारे शुभेच्छा प्रदान करून हा चित्रपट पाहण्याचे आवाहन नागरिकांना केले.
‘व्हायरस २०२०’ या चित्रपटाचे लेखन सचिन गोटे यांनी केले तर दिग्दर्शन दिपक नांदगावकर यांनीकेले आहे. तसेच तांत्रिक सहायक सचिन गोटे , संगीत विशाल चर्जन – विनायक दास,प्रयोग समन्वयक ऋषिकेशन प्रधान, वेशभूषा धनश्री लंगडे यांची आहे. तर चित्रपटात नम्रता प्रेमलवार, कल्याणी वकाले, सौरभ शेंडे, श्रीलेश पांडे, राजेंद्र म्हस्के, सचिन गोटे, अजय तायडे, अक्षय वाहुलकर आदिंनी भूमिका साकारल्या आहेत. कार्यक्रमाला साधना म्हस्के, अनुज म्हस्के, कांचन म्हस्के, डॉ.गुंजाली म्हस्के, अनिकेत देशमुख, अथर्व काशीकर, स्नेहा लंगडे आदि उपस्थित होते.