मराठी

‘व्हायरस २०२०’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड

अमरावती/दि.२७ – कोरोनाग्रस्त कुटुंबियांची तगमग दर्शविणाऱ्या ‘व्हायरस२०२०’ या लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता निवड करण्यात आली आहे. सचिन गोटे लिखित तसेच दीपक नांदगावकर दिग्दर्शित या लघुपटात नम्रता प्रेमलवार, कल्याणी वाकळे, सौरभ शेंडे, श्रीलेश पांडे, राजेंद्र म्हस्के, सचिन गोटे, अजय तायडे, अक्षय वाहुलकर आदींनी भूमिका साकारल्या. तर लघुपटाला संगीत विशाल चर्जन-विनायक दास, तांत्रिक सहाय सचिन गोटे, वेशभूषा धनश्री लंगडे आदींची लाभली. छायांकन ऋषिकेश प्रधान यांनी केले. कोरोना काळात सर्व काळजी घेऊनही कोरोनाची झालेली लागण आणि त्यानंतर कुटुंबियांची होणारी तगमग या लघुपटातून दर्शविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाची निवड होणे ही अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

Related Articles

Back to top button