रावे उपक्रमाद्वारे कृषिदूतांची (ADCC) अमरावती दिस्टिक कॉ- ऑपरेटिव्ह बँकला भेट
अंजनगाव(सुर्जी) दि २ :- श्रम साफल्य फौंडेशन द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ संलग्नित सौ. वसुधाताई देशमुख कृषि महाविद्यालय बोडणा, अमरावती येथील 7 व्या सत्राचे विद्यार्थी “ग्रामीण कृषि कार्यानुभव” या शैक्षणिक कार्यक्रमा अंतर्गत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या मुळ गावात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कृषिदूत म्हणुन कार्य करीत आहेत. कृषिदुत प्रज्ञेश प्रविणराव हाडोळे आणी शामली अंकुशराव बोबडे यांनी नेतृत्व केले.
या अंतर्गत अंजनगाव(सुर्जी)तालुक्यातील (ADCC) अमरावती दिस्टिक कॉ- ऑपरेटिव्ह बँक ला भेट देऊन बँक शाखा अधिकारी राठोड साहेब व इतर कर्मचाऱ्यांच्या मार्गद्शनाखाली बँक कर्ज , पीक कर्ज,किसान क्रेडिट कार्ड(KCC) योजनाबद्धल तसेच कर्ज घेण्याची पद्धत, लागणारे कागदपत्रे, कर्ज घेण्याची मर्यादा,परतफेड या विषयांची संपूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्यांना माहिती पुरविण्यात आली की, या कर्ज प्रक्रियेचा त्यांना सुलभ पद्धतीने आर्थिक लाभ कसा होईल.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय देशमुख,विषयतज्ञ कृषी अर्थशास्त्र प्रा. डॉ. कविता चोपडे , रावे प्रभारी प्रा. डॉ. इंद्रप्रताप ठाकरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपिका उके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. .