धारणी/दि.२१ – शहरातील कापड दुकानांची चाळ आणि सर्वाधिक गजबजलेल्या बाजारात आग लागल्याने 20 व्यापारी सडकेवर आले तर 10 व्यापार्?यांना आंशिक नुकसान झालेले आहे. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की दुसर्?या दिवशीही ढिगारातून धूर निघत राहला. तीन-चार दुकानाचा विमा होता. मात्र इतर व्यावसायिक आता शासनाकडे तोंड करुन उभे आहेत. प्रभावितांना शासनाने भाडे पट्टीवर जागा दिल्यास व्यापारी फिनिक्स पक्ष्यासारखे या राखेतून नवीन आर्थिक जीवनाचा उदय करू शकतात. दरम्यान, आ. राजकुमार पटेल यांनी शनिवारी आगीची झळ पोहचलेल्या व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केली.
छटपर्वाची सकाळ धारणीसाठी वेदनादायक ठरली. 20 दुकाने राखेच्या ढिगारात परिवर्तीत झाल्याने दिवाळीनंतरचा भोंगडू बाजार सुद्धा जळाला. सर्व स्तरावर सहानुभूती प्रदर्शित होत आहे. मात्र शासकीय सहायता कशी किंवा कोणत्या स्वरुपात होईल, हे समजलेले नाही. आ. राजकुमार पटेल यांनी प्रभावितांना भेटून मदतीसाठी शासन दरबारी ताकदीने फिर्याद मांडण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. 126 सर्व्हे नंबर मधील जागेवर असलेली 20 दुकाने तथा 10 दुकानांचे किरकोळ नुकसान झालेले आहे. प्रभावितांना मदत कशी मिळणार या विषयी तर्कवितर्क लढविले जात असतांना व्यापार्?यांना ठोस मदत करण्यासाठी जळालेल्या जागेवर एका निश्चित प्रमाणात भाडे तत्वावर जागा देण्याची आवश्यकता आहे.