मराठी

वक्फ बोर्ड अयोध्येत उभारणार रुग्णालय, अभ्यासिका, संशोधन केंद्र

प्रवक्ता अतहर हुसैन यांनी शनिवार याबाबत माहिती दिली

लखनऊ दि ८ – उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला अयोध्येत मशीद वा अन्य उभारणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार मिळालेल्या जमिनीवर लोकोपयोगी वास्तूची उभारणी करण्यात येण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या सुविधेसाठी उभारणी करण्यात येणार्या वास्तूच्या शिलान्यासासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन‘ ट्रस्टचे सचिव आणि प्रवक्ता अतहर हुसैन यांनी शनिवार याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की उच्चतम न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्यातील धन्नीपूर गावात वक्फ बोर्डाला मिळालेल्या पाच एकर जमिनीवर रुग्णालय, ग्रंथालय, सामुदायिक स्वयंपाकघर आणि संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. या सर्व बाबी जनतेच्या सुविधेसाठी असतील. राज्याचा मुख्यमंत्री हा जनतेसाठी काम करीत असतो. यानुसार या वास्तूच्या शिलान्यासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमात केवळ सहभागीच होणार नाहीत, तर यासाठी सहयोगही करतील, असा विश्वास हुसैन यांनी व्यक्त केला. बुधवारी आदित्यनाथ यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना आपल्याला मशीदीच्चा पायाभरणीसाठी बोलविले जाणार नाही आणि बोलविले, तरी मी तिथे जाणार नाही, असे वक्तव्य केले होते. अयोध्येतील मंदिराच्या शिलान्यासानंतर सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेल्या जमिनीवर मशिदीच्या शिलान्यासाठी जाणार का, याबाबत पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला होता. सुन्नी वक्फ बोर्डाच्या या निर्णयामुळे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. राम मंदिराची उभारणी करण्यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकत्र्यांकडून येथे लोकोपयोगी वास्तू उभारण्याबाबत प्रतिक्रिया दिली जात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button