मराठी

वरुडचा संत्रा बांग्लादेशासह देशभरातील बाजारपेठेत निर्यात

संत्रा निर्यात सुविधा केंद्र, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या पुढाकाराने

वरुड/दि.१० – संत्रा निर्यात सुविधा केंद्र वरुड, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे या सुविधा केंद्रातून डॉ.पंजाबराव देशमुख कृषि शेतमाल पणन सहकारी संस्था वरुड, सिट्रस अॅग्रो कंपनी दिल्ली व अॅग्रोलिप या संस्था व शेतक:यांच्या सहकार्यातून २०० टन संत्र्याची वॅक्सिंग व पॅकिंग करुन सदर संत्रा बांगलादेश, सिलीगुडी, दिल्ली, हैद्राबाद व चेन्नई बाजारपेठेमध्ये पाठविण्यात आला आहे. यापुढेही हंगाम संपेपर्यंत कामकाज सुरु राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासुन संत्र्याचे भाव एकदम गडगडल्याने शेतक:यांसह व्यापारी सुध्दा हतबल झाले आहेत. अनेक शेतक:यांच्या शेतामध्ये संत्रा झाडालाच आहे. झाडाला असलेला संत्रा गळुन खाली पडत आहे. अनेक शेतांमध्ये संत्रा फळे सडत आहेत, अशा स्थितीत शासनाकडून संत्र्याला भाव मिळावे, या उद्देशाने विविध उपाययोजना केल्या जात आहे. देशातील विविध मोठमोठ्या बाजारपेठांसह देशाबाहेर सुध्दा संत्रा पाठवुन त्याला चांगले दर मिळतात काय? याची चाचपणी करुन शेतक:यांना अधिक लाभ होवु शकतो काय? याकरीता प्रयत्न करतांना दिसुन येत आहे.
याकरीता राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, पणन, गृह व वित्त राज्यमंत्री शंभुराजे देसाई, माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि शेतमाल पणन सहकार संस्था वरुड या संस्थेच्या अध्यक्षा डॉ.वसुधा बोंडे, उपाध्यक्ष रमेश हुकूम, संचालक रविकिरण वाघमारे, डॉ.अमोल कोहळे तसेच अखिल भारतीय संत्रा उत्पादक संघाचे कार्याध्यक्ष अमोल तोटे आदींनी सहकार्य केलेले आहे. या सुविधा केंद्रातून संत्रा उत्पादकांनी संत्रा वॅक्सिंग, पॅकिंग आदी करुन घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
या करीता अमरावती विभागीय कार्यालय कृषि पणन मंडळाचे उपव्यवस्थापक महादेव बरडे, फलोत्पादन विकास अधिकारी राहुल गोरे, ऑपरेटर सुभाष साळुंके यांच्यासह अन्य अधिकारी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Back to top button