वरुड/दि.२५ – राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांचे अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषि मंत्री हर्षवर्धन देशमुख व आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वागत केले.
यावेळी अमरावती भेटी दरम्यान आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांचेशी अनेक महत्वपूर्ण विषयावर झाली चर्चा झाली.
वरुड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन, बृहत आराखड्यात मंजूर असलेल्या वरुड व मोर्शी तालुक्यातील उप आरोग्य केंद्रा करिता निधी उपलब्ध करणे, मोर्शी येथे उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर युनिट सुरू करण्याकरिता मंजुरी प्रदान करणे व निधी उपलब्ध करुन देणे आदी विषयावर महत्वपूर्ण चर्चा झाली.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषि मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील, जि.प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, संदीप खडसे, ऋषीकेश राऊत, ज्ञानेश्वर यावले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.